Municipal Corporation Election: महागाई वाढली हो..! महापालिका निवडणुकीचा खर्च अडीच पटीनं वाढला

Local Body Election : साडेतीन वर्षांपासून लांबणीवर पडलेली नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2026 उजाडण्याची वाट बघावी लागणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च मनपा प्रशासनाला अपेक्षित आहे.
Maharashtra local body elections
Maharashtra local body electionsSarkarnama
Published on
Updated on

ठळक मुद्दे :

  1. नागपूर महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून, हा 2017 च्या तुलनेत अडीच पट वाढलेला आहे.

  2. शहरातील 24.47 लाख मतदारांसाठी 2900 हून अधिक मतदान केंद्रे तयार केली जाणार असून, निवडणूक प्रक्रियेसाठी 20 हजारांहून अधिक कर्मचारी लागणार आहेत.

  3. मतदान केंद्रांची सुविधा, कर्मचाऱ्यांचे मानधन, सीसीटीव्ही, ईव्हीएम वाहतूक यासाठी खर्च वाढणार असून प्रभाग रचनेवर सुनावणी पूर्ण होऊन अंतिम प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवला गेला आहे.

Nagpur News : महागाईवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच जुंपते. सत्तेवर असलेल्यांना नकार द्यायचा आणि विरोधकांनी आरोप करायचे हा राजकीय खेळ वर्षांनुवर्षांसून सुरू आहे. विरोधात असताना भाजप (BJP) कुठल्याही विषयावर आंदोलन करीत होती. पेट्रोलचे दर एक रुपयांनी वाढले तरी रस्त्यावर चुली मांडून आंदोलन केले जात होते. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत येताच महागाईवर त्यांचे कार्यकर्ते मूग गिळून बसले असल्याचे दिसून येते.

उलट पेट्रोलची दरवाढ कशी आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. मात्र प्रशासनाचा भाग असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवरून दरवाढ अडीच पटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. साडेतीन वर्षांपासून लांबणीवर पडलेली नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2026 उजाडण्याची वाट बघावी लागणार आहे.

या आगामी निवडणुकीसाठी (Election) तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च मनपा प्रशासनाला अपेक्षित आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर महापालिकेला 7.56 कोटी रुपये खर्च आला होता. आता आठ वर्षांनंतर वाढलेल्या किमती आणि सुविधांमुळे आगामी निवडणुकीच्या खर्च 20 कोटींच्या घरात जाणार असल्याचा अंदाज घेऊन आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra local body elections
Election Commission EVM: निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; शरद पवारांच्या उमेदवारांना लोकसभा अन् विधानसभेला बसला होता फटका

नागपुरात 2017 प्रमाणेच आगामी निवडणुकीसाठी 38 प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे यातून एकूण 151 नगरसेवक निवडले जातील. यात 37 प्रभागांमधून प्रत्येकी चार, तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. 1 जुलै 2025 च्या मतदार यादीवर आधारित, शहरात 24 लाख 47 हजार 494 मतदार निश्चित झाले असून, यंदा मतदान केंद्रांची संख्या 2783 वरून 2900 पेक्षा अधिक राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर (बुथवर) 800 ते 900 मतदार ठेवण्याचे नियोजन आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे वीस हजारांहून अधिक कर्मचारी लागण्याची अपेक्षा मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Maharashtra local body elections
BJP President News: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अचानक महाराष्ट्रातून 'हे' मोठं नाव आलं चर्चेत; 'RSS' आपली 'ती' इच्छा पूर्ण करणार?

त्यानुसार या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन, भोजन, ईव्हीएमची ने-आण करण्याची वाहतूक, मतदान केंद्रांवरील मंडप उभारणे, कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण, स्ट्रॉंगरूमवरील सुविधा, मतमोजणी कक्षातील सुविधा, सीसीटीव्ही आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीचा खर्च समाविष्ट आहे.

मनपाने यासाठी 20 कोटी रुपयांचे प्रावधान अर्थसंकल्पात केले आहे. प्रभाग रचनेचे कामही पूर्ण झाले असून, प्रारूप रचनेवर 115 हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आली आहे.

Maharashtra local body elections
Dhananjay Munde News: मार्च महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा; धनंजय मुंडे सरकारी बंंगला केव्हा सोडणार? मोठी अपडेट समोर

Q1. 2026 च्या नागपूर महापालिका निवडणुकीसाठी किती खर्च अपेक्षित आहे?
➡️ मनपा प्रशासनाने 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.

Q2. 2017 च्या तुलनेत निवडणुकीचा खर्च किती वाढला आहे?
➡️ खर्च तब्बल अडीच पट वाढून 7.5 कोटींवरून 20 कोटींवर गेला आहे.

Q3. नागपूरमध्ये किती नगरसेवकांची निवड होणार आहे?
➡️ एकूण 151 नगरसेवकांची निवड होणार आहे.

Q4. एकूण मतदारसंख्या किती निश्चित झाली आहे?
➡️ 1 जुलै 2025 च्या यादीप्रमाणे 24,47,494 मतदार निश्चित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com