Municipal Corporation Elections : मुंबई महापालिकेसाठी महायुती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मात्र भाजप स्वतंत्र चूल मांडणार?

Mumbai Municipal Corporation Elections 2025 News : एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे, अजितदादांच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यात मात्र महायुती होण्याची शक्यता कमी असून त्यामुळे येत्या काळात मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची सध्या लगीनघाई सुरु आहे. जानेवारी महिन्यात मुंबईसह जवळपास 28 महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये सर्वांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. मात्र, मुंबई महापालिकेसाठी महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होणार आहे. मात्र, येत्या काळात होत असलेल्या एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे, अजितदादांच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यात मात्र महायुती होण्याची शक्यता कमी असून त्यामुळे येत्या काळात मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच दिसत आहे.

भाजपने (BJP) गेल्या वर्षभरापासून मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सर्वच तयार दर्शवली आहे. मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे वारंवार सांगितले जात आहे. पण अन्य शहरांमध्ये काय होणार, हे अद्याप स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आणि अजित पवार यांच्या पुण्यात भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार फिल्डींग लावली आहे.

Mahayuti Government
BJP Ganesh Naik warning : शिंदेंच्या शिवसेनेची भाजप मंत्र्यांविरोधात न्यायालयात धाव; गणेश नाईकांचा, 'दम है तो रोक के बताओ'चा इशारा

आगामी काळात होत असलेल्या ठाण्यात भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेसेनेच्या कोंडीचे प्रयत्न होत आहेत. पण शिंदे यांच्याविरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी घेतली आहे. नवी मुंबईतील समर्थकांमध्ये दादा नावानं सुपरिचित असलेले नाईक ठाण्यातील भाईंना थेट आव्हान देत आहेत.

Mahayuti Government
Mumbai BMC election : मुंबई महापलिका निवडणुकीत चुरस; ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेसाठी लढाई अधिक खडतर!

गेल्या 40 वर्षांपासून गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर वर्चस्व आहे. ठाणे जिल्हा एकसंध असताना, पालघर जिल्हा वेगळा झालेला नसताना नाईक यांच्याकडे ठाण्याचं पालकमंत्रिपद होतं. 1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. तेव्हा नाईक ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी शिंदे ठाणे महापालिकेत नगरसेवक होते. पुढे नाईक 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. त्यानंतरही त्यांनी नवी मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवलं.नवी मुंबई महापालिका अस्तित्त्वात आल्यापासून नाईक यांचं वर्चस्व आहे. 2020 मध्ये महापालिकेची निवडणूक अपेक्षित होती. पण आधी करोना आणि मग आरक्षणामुळे निवडणूकच झाली नाही. त्यामुळे मागील 5 वर्ष नवी मुंबई महापालिका प्रशासकाच्या माध्यमातून चालवली जात आहे.

Mahayuti Government
Padalkar Vs Jayant Patil : सांगलीचं राजकीय वातावरण तापलं, पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची किनार इंजिनिअरचा मृत्यू?

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असल्यानं नवी मुंबई महापालिकेचा कारभार ठाण्यातून सुरु झाला. नवी मुंबई महापालिकेची सत्ता कायम आपल्या हाती राखणाऱ्या नाईकांना रुचलेली नाही. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत त्यांचा उघड संघर्ष सुरु झालेला आहे. ठाणे महापालिकेत युती झाली, तरीही नवी मुंबईत युती करायची नाही, असा नाईक यांचा पवित्रा आहे. त्यासाठी नाईक यांना राज्याची आणि केंद्राची किती साथ मिळते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Mahayuti Government
BJP MLA Gopichand Padalkar : यशोमती ठाकुर कडाडल्या; फडणवीसांना 'गिरेबान में झांक के देखो'चा टोला

पुणे महापालिका ही राज्याचे दुसरे मुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी देखील भाजप व अजित पवार यांच्या भाजपमध्ये चुरस पाहवयास मिळते. याठिकाणी गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता होती. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून याठिकाणी महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात महायुती याठिकाणी युती करणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Mahayuti Government
Local Body Elections : खबर पक्की! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक,महापालिकेचाही मुहूर्त ठरला!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता होती. त्यामुळे याठिकाणी देखील येत्या काळात महायुतीमधील भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस दिसत आहे. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. गेल्या टर्ममध्ये याठिकाणी भाजपची सत्ता होती तर त्यापूर्वी या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे याठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

Mahayuti Government
NCP Politics: साहेब, दादा, ताई एक व्हा, झाले गेले गंगेला मिळू द्या....; राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं धरला पुन्हा जोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com