Maratha Andolan News : मराठा समाज आक्रमक : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यांना साड्या घालून अंत्ययात्रा

Maratha Reservation News : शनिवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
Beed News
Beed NewsSarkarnama

Beed News : मराठा आरक्षण मागणीची धग व आरक्षणासाठी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांसह महिला, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीहल्याच्या घटनेचे तिव्र पडसाद शनिवारी जिल्ह्यात उमटले. शनिवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

हिंगणी (ता. धारुर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना साड्या नेसवून गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तरुणांनी सरकार व या तीन प्रमुख नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यांना साड्या नेसवण्यात आल्या. प्रतिकात्मक अंत्ययात्रेसमोर तिरडीही होती.

Beed News
Maratha Reservation News : आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सरपंचाने स्वतःची कार जाळून केला निषेध..

दरम्यान, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पोलिसांच्या आडूनही दडपशाही थांबवा, अशा घोषणांनी जिल्हा दणानून गेला. सार्वजनिक बससेवा शुक्रवारी रात्रीपासूनच पुर्णपणे बंद होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच, दवाखाना व शासकीय कामांसाठी या शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातील विविध घटकांनी आपली भूमिका मांडली. आरक्षण मिळाले पाहीजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये वकील बांधवांनीही जिल्हाधिकारी फेरी काढून बंदला पाठींबा दिला.

Beed News
CM Eknath Shinde On Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये...

शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा ओस पडल्या होत्या. परिवहन महामंडाळच्या दोन बस जाळल्याच्या घटना गेवराई तालुक्यातील धोंडराइ व गुळज येथे रात्री घडल्या. तर, मोहा (ता. परळी) येथे दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या असून राजूरी (ता. बीड), माजलगाव व याच तालुक्यातील लऊळ येथेही बसच्या काचा फोउल्याची माहिती, विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com