उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. २०१९ साली अशाचप्रकारे कोल्हापुर, सांगली येथे नुकसान झाले होते, तेव्हा कोरडवाहु पिकांना २० हजार ४०० रुपयांची मदत देऊन तिथं पिककर्ज माफ केले होते. (Osmanabad) मग मराठवाडा व विदर्भानी कोणत पाप केले आहे, असा सवाल आमदार कैलास घाडगे पाटील (Kailas Patil) यांनी सरकारला केला.
कृषीमंत्री मराठवाड्यातील तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे असुनही शेतकऱ्यांना मदतीबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. (Marathwada) विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाच्या प्रस्तावर आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आमदार पाटील म्हणाले की, जाहीर केलेली मदत व २०१९ मध्ये कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील मदत यामध्ये मोठा फरक आहे. मराठवाडा व विदर्भावरच असा अन्याय का? सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी दिसत नसली तरी सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे.सोयाबीन पिक पुर्णतःवाया गेले आहे, त्यामुळे सरसकट सोयाबीनचे पंचनामे झाले पाहिजे.
गोगलगाईमुळे उस्मानाबाद, बीड व लातुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. किडीसाठी फक्त साडेसातशे रुपये दिले जातात. त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणुमुळे पिक पिवळे पडते, त्याला शेंगा लागत नाहीत. शेंगा लागल्या तर त्यात दाणे भरत नाही. त्यामुळे याने देखील पिकांचे नुकसान झाले आहे.
बोंडअळी लागल्यावर कापसाला मदत केली होती, त्याप्रमाणे या यलो मोझॅकचा समावेश करुन तशी मदत दिली पाहिजे अशी मागणी देखील पाटील यांनी केली. जमीन खरडुन गेल्यानंतर एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार बहुभुधारकाना मदत मिळत नाही, त्यात किमान दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचा समावेश करुन मदत करणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुर देखील पशुधनाचा सांभाळ करतात पण त्याना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. अशा शेतमजुरांच्याही बाबतीत मदत करण्याची भुमिका सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी घाडगे पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.