
Chhatrapati Sambhajinagar politics : 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विषयी असलेली तळमळ व्यक्त केली. "औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) आंतरराष्ट्रीय ओळख आहे.
राजकारण होत राहिल, पण येणारी आव्हानं लक्षात घेऊन शहराचं औद्योगिकीकरण, सामाजिकरण, प्रशासकीय व्यवस्थापन, एअर कनेक्टिव्हिटी आदी मुद्यांवर सत्ताधारी राजकीय नेतृत्वानं अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची गरज व्यक्त केली. तेच होत नसल्याने औरंगाबादची (छत्रपती संभाजीनगर) सर्वच पातळीवर मागं पडलं असून, या अभ्यासूवृत्तीचा सध्याच्या राजकीय नेतृत्वाकडे अभाव आहे", असा घणाघात इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.
इम्तियाज जलील म्हणाले, "खैरे, भुमरे, दानवे हे सर्व भेटतात. हाय-हॅलो इतपर्यंत सर्व काही चालते. पण ते मनामध्ये मला नक्की शिव्या देत असतील. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विषयी हे अभ्यासच करत नाही. यांना काहीच देणघेण नाही". अभ्यास काय असतो? हेत त्यांना माहित नाही, असा टोला देखील जलील (Imtiaz Jaleel) यांनी लगावला.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) इथल्या सामाजिक, राजकीय, भौगोलिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनावर किती पकड पाहिजे, हे सांगताना राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकमेव नेता आहे की, त्याची ती पकड दिसते. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) इथंल्या राजकीय नेत्यांचा कुठेच अभ्यासूपणा दिसत नाही. हे सांगताना इम्तियाज जलील यांनी काही उदाहरणं मांडली.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) इथं कचऱ्याचा मोठा इश्यू झाला होता. लाठीचार झाला होता. विधानसभेत मुद्दा गाजला होता. पुण्यातील एका कंपनीने ठेका घेतला होता. खूप चांगली कंपनी होती. कधीच दोन नंबरचं काम करत नाही. त्यांचा एक अधिकारी नेत्याला भेटला. हा नेता कोण? सर्वांना माहिती आहे. त्यांना कचऱ्याविषयी काहीच देणे-घेणे नव्हते. तो त्याचाच बघत होता. त्याचे टेन्शन बघतलं. त्यानंतर ते अधिकारी माघारी फिरल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
'दारूचे दुकाने शहरात बंद झाले पाहिजे, आणि ते शहराबाहेर गेली पाहिजे. पण नाही होत. होणार नाही. पुणे, मुंबईमधील राजकीय नेते विकासाच्या मुद्यावर एकत्र येतात. आमच्याकडे तसं होत नाही. सगळे नेते आमच्याकडे एकत्र येत नाही. शहराचा विचार मांडत नाही. शहरातील सर्व नेत्यांनी सहा महिन्यांतून एकदा दोन-तीन तास एकत्र बसून, त्यावर चर्चा केली पाहिजे. तसं कधी झालेलं नाही. हे दुर्दैवी आहे', असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.
'औद्योगिकरणाला ज्यापद्धतीने गती मिळालयाला पाहिजे होती, ती झालेली नाही. इनस्पिरा नावाच्या कंपनींने एमआयडीसीकडून किरकोळ भावात जमीन घेतली. एसीझेड आणणार आहे, असे सांगून ही जमीन किरकोळ भावात घेतली. मग या कंपनीच्या बोर्डात ठराव झाला की, एसीझेड रद्द करून त्यावर प्लाॅटिंग करणार आहोत. सरकारकडून घेतली एका उद्दिष्टासाठी, पण ते पूर्ण करत नसेल, तर ती जमीन परत घेतली पाहिजे होती. पण तसे झाले नाही. एकाही राजकीय नेत्यांने त्यावर आवाज उठवला नाही', याची खंत इम्तियाज जलील यांनी म्हटले.
'या कंपनीने 70 रुपयांनी घेतलेली जमीन 1200 रुपये चौरसफूटांना आता विकत आहे. मी बोलतो ते खरं बोलतो आहे. त्यामुळेच माझ्याविरोधात अॅक्शन होत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला आहे. एका मंत्र्यांच्या मुलांनं तिसरं लग्न केलं. यावर कोणीच काही बोलत नाही. मुस्लिमांच्या ट्रिपल तलाकवर हाच मंत्री दररोज बोलत होता. पण कुठंच काही विरोध होत नाही. का गप्प बसलेले आहे. यातून चिड निर्माण होते', असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.