Shivsena UBT News : राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजते आहे. मंत्रीपदाचा दुरुपयोग करून ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या या भूखंडावरील आरक्षण हटवून तो मंत्री शिरसाट यांच्या मुलाला विकण्यात आल्याचा आरोप आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात शिरसाट व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सदर भुखंडाची माहिती मागवली आहे.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर पत्र लिहित या संपूर्ण भुखंड विक्री प्रक्रियेची कागदपत्रे व माहिती मागितली आहे. दानवे यांनी लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनलसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या दोन भूखंडांपैकी दुसऱ्या क्रमांकावरील सुमारे 21275 चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड, मंत्रिपदाचा दुरुपयोग करुन 'Cameo Distilleries Pvt. Ltd.'या खासगी कंपनीस प्रदान करण्यासाठी संबंधित आरक्षण हटविण्यात आले.
सदर कंपनी ही विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या निकटवर्तीय नातलगांशी संबंधित असून, भूखंड मिळविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रशासनाशी संगनमत करत नियमबाह्यारीत्या निर्णय घेण्यात आल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. (Sanjay Shirsat) सदरहू बाब गंभीर स्वरुपाची आहे. तनुषंगाने मला खालील मुद्याची माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या दोन भूखंडांबाबतचा मूळआरक्षण आदेश व त्यामधील कोणताही बदल / रद्द करण्याबाबतचा निर्णय व कारणमीमांसा. 'Cameo Distilleries Pvt. Ltd.' या कंपनीस वरील भूखंड देण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही, अर्जाची प्रत, भूखंड वाटपाचा निर्णय, जमीन मूल्यनिर्धारण आणि तत्संबंधी सर्व कागदपत्रे.
सदर कंपनीचे मूळ भागधारक, संचालक मंडळ, त्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक व आर्थिक पार्श्वभूमी, तसेच त्यांनी प्रकल्पासाठी सादर केलेले वित्तीय प्रस्ताव. कंपनीच्या भागधारकांपैकी विजया शिरसाट यांच्या उत्पन्नाचा तपशील आणि त्यास अनुज्ञेय असलेले युको बँकेकडून मंजूर झालेल्या कर्जासंबंधी प्रक्रिया व सादर केलेल्या हमीपत्रांची माहिती, दानवे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागितली आहे.
सदर प्रकरणासंदर्भात एमआयडीसीमार्फत कोणतीही तांत्रिक समिती/शिफारस समिती गठीत करण्यात आली असल्यास त्यांचे मत व अहवाल. सदर भूखंडावर प्रत्यक्षात कोणती उत्पादन प्रक्रिया प्रस्तावित असून, ती औद्योगिक धोरणास अनुरूप आहे काय, याबाबतची अधिकृत भूमिका. सदर माहिती व सोबत कागदपत्रे मला आगामी विधानमंडळ कामकाजासाठी आवश्यक असल्याने, तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राची प्रत मुख्य सचिव, प्रधान सचिव, उद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांनाही देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.