

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर लढणाऱ्या एमआयएमने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आघाडी घेतली खरी. पण यातून पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे काल दिसून आले.
शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी जाहीर झालेल्या एका भावी नगरसेवक आणि त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. प्रभागातून रॅली काढत असतानाच दुसऱ्या इच्छुकाच्या समर्थकांनी थेट त्याच्यावर हल्ला चढवत त्याच्या गळ्यातील हार ओढत त्याला बुकलून काढले. यामुळे एमआयएममध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसून आले.
एमआयएमने सोशलमिडीयावर चार उमेदवारांची दुपारी दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर किराडपुरा येथे राडा झाला. प्रभाग 12 मधून सर्वसाधारण जागेतून युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार यांना पक्षाने उमेदवारी दिली. याठिकाणी हाजी इसाक खान हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. असरारला तिकीट मिळाल्याने हाजी इसाक खान यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप दिसून आला.
उमेदवारी मिळाल्यानंतर असरार हे येथील रहीवाशांना भेटण्यासाठी रैली काढली असता त्यांचा जागोजागी सत्कार करण्यात आला. या गर्दीत हाजी इसाक खान यांच्या समर्थकांनी असरारला धक्काबुक्की करत गळ्यातील हार काढून फेकले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जीन्सी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला. यानंतर येथील तणाव निवळला व येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा जमाव जीन्सी पोलिस ठाण्यासमोर जमला.
याठिकाणी प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर आले त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हाजी इसाक खान यांनी पक्षासाठी रात्रंदिवस एक केले. प्रत्येक निवडणुकीत येथून एमआयएमला मते मिळवून देत वार्डाच्या विकासासाठी योगदान दिले आणि पक्षाने सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्त्याचा तिकीट कापल्याचा आरोप यावेळी त्यांच्या समर्थकांनी करत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
याप्रसंगी जमाव शांत होत नसतात हाजी इसाक खान यांनी गाडीवर चढून जमावाला शांत केले. वार्डातील नागरिक सोबत आहे. नागरिकांनी शांतता ठेवावी. आपल्याला न्याय मिळेल कायदा हातात घेऊ नका. वार्डातील जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे त्यांनी जाहीर केल्यानंतर जमाव परत गेला. तक्रार न देता दोन्ही गट परत गेले. आता हे पाहावं लागेल एमआयएमचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांचा राग कमी करण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
12 नंबर प्रभागात कटकट गेट, किराडपुरा शरीफ काॅलनी, रहेमानिया काॅलनीचा काही भाग, बाबर काॅलनी, नाहीद नगर, यशोधरा काॅलनी हा भाग येतो. दोन सर्वसाधारण जागेसाठी एमआयएम (AIMIM) पक्षाचे दोन उमेदवार जाहीर झाले आहे आता एक सर्वसाधारण महिला व एक ओबीसी महीला आरक्षित जागेसाठी उमेदवार जाहीर झालेले नाही.
या राड्यानंतर प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले उमेदवार माझ्याकडे निश्चित होत नाही माझ्याकडे फक्त मुलाखती झाल्या. पक्षाचे सर्वे्सर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी निर्णय घेतात मी फक्त यादी सोशल मिडियावर जाहीर करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.