Jalna MahaPalika : रावसाहेब दानवेंची एन्ट्री होताच सूत्र फिरली : जालन्यात जागा वाटपाची चर्चा निर्णायक टप्प्यावर; 48 तास धाकधुकीचे

BJP ShivSena alliance : जालना महापालिकेतील भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चा निर्णायक टप्प्यात असून दोन्ही पक्षांनी 40 जागांचा दावा केल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे.
After Raosaheb Danve intervention Jalna Municipal Alliance talks gain momentum as BJP and Shiv Sena exchange proposals,
After Raosaheb Danve intervention Jalna Municipal Alliance talks gain momentum as BJP and Shiv Sena exchange proposals, Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Alliance News : जालना महापालिका निवडणुकीत रखडलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या बोलणीला काल भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर वेग आला. दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव पाठवले असून 65 जागा असलेल्या महापालिकेसाठी दोघांनी प्रत्येकी 40 जांगावर दावा केला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 2 दिवसांत मराठवाड्यातील पाचही महापालिकांतील युतीचा निर्णय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी दिला आहे.

जालन्यात शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी 40-40 जागांवर दावा केल्याने आता माघार कोण घेणार? आणि युतीवर शिक्कामोर्तब होणार का? याचा फैसला पुढच्या 48 तासात होण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेनाची युती होणार की नाही? याकडे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे लक्ष लागले आहे. अशात भाजप-शिवसेनेची युती होण्याची उंबरठ्यावर आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

महापालिकेसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत एकाही पक्षाकडून अधिकृत पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. भाजप-शिवसेनेकडून सध्या युतीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपकडून प्रतिदास मिळत नव्हता. परंतु, शुक्रवारी भाजपकडून शिवसेनेकडे मनपा निवडणुकीत 40 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

या बैठकीत भाजपच्या पूर्वीच्या 12 जागा तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासोबत आलेल्या माजी नगरसेवकांच्या 28 अशा 40 जागांवर भापजकडून दावा करण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून (Shivsena) तितक्याच जागांवर दावा करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांना समान जागा हव्या आहेत. त्यामुळे आता या दोन्ही पक्षापैकी कोणता पक्ष दोन पाऊले मागे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

After Raosaheb Danve intervention Jalna Municipal Alliance talks gain momentum as BJP and Shiv Sena exchange proposals,
Local Body Election News : 'बाप से बेटा सवाई', जिथे वडील हरले, तिथेच मुलांनी विजय खेचून आणला

असा आहे प्रस्ताव

मनपाच्या 65 जागांपैकी 40 जागा भाजपसाठी (BJP) आणि उर्वरित 25 जागांमध्ये शिवसेना व इतर मित्र पक्षांनी वाटून घ्याव्यात. तर हाच प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आला आहे. यामध्ये 40 जागा शिवसेनेसाठी तर 25 जागांमध्ये भाजप व इतर मित्र पक्षांनी वाटून घ्याव्यात. त्यामुळे युतीचा तिढा सुटण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

After Raosaheb Danve intervention Jalna Municipal Alliance talks gain momentum as BJP and Shiv Sena exchange proposals,
PMC Election : पुण्यातील भाजप-शिवसेना युतीवर मुंबईत शिक्कामोर्तब? CM फडणवीस अन् उदय सामंतांनी फिरवला अंतिम हात; गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी, रिपाइंकडून मागणी

युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भाजप-शिवसेना 25 जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर रिपाइंकडून (आठवले गट) देखील सहा जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपामध्ये या दोन पक्षांना किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com