Minister Dhananjay Munde : बीडमधील सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही..

NCP News : सध्या या सभेचे जोरदार नियोजन सुरू असुन, रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
Minister Dhananjay Munde News
Minister Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील बंडानंतर शरद पवार यांची मराठवाड्यातील पहिली स्वाभीमानी सभा १७ आॅगस्ट रोजी बीडमध्ये पार पडली. (Minister Dhananjay Munde News) पवारांनी या सभेतून अजित पवार, धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले. या सभेची चर्चा राज्यभरात अजूनही सुरू आहे.

Minister Dhananjay Munde News
Shivsena Meeting : शिंदेंची शिवसेनाही लागली कामाला, सिल्लोड, कन्नडमध्ये निरीक्षकांकडून बैठका..

त्यानंतर आता येत्या २७ तारखेला अजित पवार हे देखील (Beed) बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेकडे शरद पवाराच्या सभेला प्रत्युत्तर देणारी उत्तरसभा म्हणून पाहिले जात आहे. परंतु बीडमधील सभा ही कुणा व्यक्तीला उत्तर देण्यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडण्यासाठी असेल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्ट केले.

या सभेच्या तयारीसाठी मुंडे यांनी बीडमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सभा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला. येत्या २७ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या या सभेचे जोरदार नियोजन सुरू असुन, रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मात्र ही सभा कोणाच्याही सभेला किंवा कोण्या व्यक्तीला उत्तर म्हणून नाही तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडण्यासाठी आहे. बीड जिल्हा मागासलेला, ऊसतोड कामगारांचा, दुष्काळी ही विशेषणे दूर करण्यासाठी एकत्रितपणे करत असलेल्या व करण्यात येणाऱ्या विकासाच्या प्रक्रियेचा लेखाजोखा मांडणारी ही सभा असेल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com