Rajesh Tope News : त्यांना म्हणायचे होते `संत` एकनाथ, पण घोळ झाला..

Paithan : राष्ट्रवादी हा पक्ष `एकनाथां`च्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.
Rajesh Tope News, Aurangabad
Rajesh Tope News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ncp : राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) पैठण येथील शेतकरी मेळाव्या संत एकनाथाचे उदाहरण द्यायला गेले, पण म्हणायचे होते संत एकनाथ आणि बोलून गेले एकनाथांच्या विचारावर राष्ट्रवादी पक्ष चालतो. या एकनाथाच्या उदाहरणामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि उपस्थितीत शेतकरी बुचकाळ्यात पडले.

Rajesh Tope News, Aurangabad
Ajit Pawar News : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, यांना मंत्रीमंडळ विस्तार करता येईना..

घोळ झाल्याचे किंवा आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जातोय, हे लक्षात आल्यावर टोपेंनी मला संत एकनाथ म्हणायचे होते, असे म्हणत सावरून घेतले. (Paithan) दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्ये आज (Ncp) राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा पार पडला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थीत होते. तत्तपुर्वी नेत्यांच्या झालेल्या भाषणात राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी पक्ष कसा सगळ्या समजाला समावून घेतो हे सांगतांना संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला.

रंजलेल्या गांजलेल्या सगळ्यांनाच आपल म्हणून एकनाथ महाराजांनी कार्य केले हे सांगत असतांना राजेश टोपे म्हणाले, राष्ट्रवादी हा पक्ष `एकनाथां`च्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्ये शेतकरी मेळावा सुरु असला तरी सध्या राजकारणात फक्त एकाच एकनाथाची चर्चा सुरू आहे.

ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष एकनाथांच्या विचारावर कसा काय चालतो? असा प्रश्न काहीजणांना पडला. ही गोष्ट टोपेंच्या लक्षात आली, यावरून विपर्यास होण्याआधीच टोपेंनी आपल्या विधानाचा स्पष्ट अर्थ उलगडून सांगितला. एकनाथ म्हणजे संत एकनाथ महाराज असे आपल्याला म्हणायचे होते, असे स्पष्ट करत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com