Eknath Shinde Shiv Sena funds hold : अजितदादांकडून निधी वाटपात एकनाथ शिंदेंची शिवसेना वेटिंगवरच...

Ajit Pawar Approves 575 Crore Beed Plan, Eknath Shinde Shiv Sena Funds on Hold : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेतल्यानंतर यंदा जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत 100 कोटी रुपयांची वाढ केली आहे.
Eknath Shinde Shiv Sena funds hold
Eknath Shinde Shiv Sena funds holdSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Beed District Planning Committee : बीड जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्याच्या निधीत सत्ताधारी पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना भरभरून वाटा मिळाल्याने ही मंडळी खूश आहे.

मात्र आघाडीच्या आमदार, खासदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी फळी आणि महायुतीतील घटक पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निधीसाठी वेटिंगवरच आहे. ही मंडळी अजित पवार यांच्या कार्यालयाकडून निधीच्या वाट्यासाठी कधी निरोप येतो याची वाट पाहत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड (BEED) जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेतल्यानंतर यंदा जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत 100 कोटी रुपयांची वाढ होऊन यंदा वार्षिक आराखडा 575 कोटी रुपयांचा झाला आहे. यावेळी या निधीतून तारांगण, ट्रीपल सीआयटी, विमानतळ जागेची तपासणी, असे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपचे विधानसभा आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार विजयसिंह पंडित, आमदार नमिता मुंदडा यांना 25 कोटी रुपयांपर्यंत, तर विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांना 10 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध केल्याने या नेत्यांनी कामांच्या याद्यांच्या शिफारशी जिल्हा नियोजन कार्यालयाकडे केल्या आहेत.

Eknath Shinde Shiv Sena funds hold
Eknath Shinde supporters fight : दादा भुसे जाताच शिंदेंच्या शिवसेनेतील आजी-माजी पदाधिकारी एकमेकांना भिडले

भाजप पक्षाच्या वाटणीच्या निधीचे नियोजन मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून होत आहे. मात्र, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना निधीसाठी आणखी वाटच पाहावी लागत आहे.

Eknath Shinde Shiv Sena funds hold
Devendra Fadnavis: पोलीस स्टेशनमधील CCTV अभावी पुण्यातील महिलांना न्याय मिळेना! अन् मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं अत्याधुनिक प्रणालीचं उद्घाटन

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी असले, तरी त्यांचा पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत कायम सॉफ्ट काॅर्नर देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही विकासकामांबाबत संदीप क्षीरसागर यांनी थेट अजित पवारांच्या आभाराचे बॅनरही लावले. मात्र, त्यांना अद्याप निधी मिळालेला नाही. तर, डॉ. योगेश क्षीरसागर यांना 10 कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com