Eknath Shinde supporters fight : दादा भुसे जाताच शिंदेंच्या शिवसेनेतील आजी-माजी पदाधिकारी एकमेकांना भिडले

Gadchiroli Eknath Shinde Shiv Sena Leaders Supporters Clash Sandeep Thakur & Rakesh Belsare Dispute : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून येऊ लागला आहे.
Eknath shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Shiv Sena updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून येऊ लागला आहे. स्थानिकांना डावलून कालप-रवा पक्षात प्रवेश घेऊन जिल्हा प्रमुख झालेले संदीप ठाकूर आणि माजी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला.

ठाकूर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भंडारा मतदारसंघाचे आमदार आणि पूर्व विदर्भाचे समन्वयक नरेंद्र भोंडेकर यांनी आयात केले आहे. तेव्हापासूनच खटके उडायला सुरुवात झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा असंतोष आणखी उफाळून येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भोंडेकर भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांची पूर्व विदर्भाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्‍यात आली आहे. त्यानंतर त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन संघटनेत मोठे फेरबदल सुरू केले होते. जुन्या लोकांना हटवून आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मोठी नाराज पसरली होती. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पूर्व विदर्भातील नेत्यांची बैठक तातडीने यानंतर बोलावली होती. किरण पांडव पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख आहेत. याशिवाय राज्यमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री आहे. कृपाल तुमाने हे आमदार आहेत. हे सर्व त्यावेळी एकत्र आले होते. त्यानंतर आशिष जयस्वाल यांच्या संमतीशिवाय कुठलाही प्रवेश समारंभ व पक्षप्रवेश होणार नाही, असा निर्णय एकनाथ शिंदे शिवसेनेने घेतला आहे.

Eknath shinde
Sujay Vikhe BJP : 'लोक म्हणतात, आमची चूक झाली, तेव्हा मला खूप आनंद होतो'; सुजयदादा म्हणाले, 'मी मतासाठी लाचार...'

मात्र भोंडेकर यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले आहे. यातून गुरुवारी आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. गुरुवारी शिक्षण मंत्री दादा भुसे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी गडचिरोलीतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दादा भुसे यांच्यासोबत जिल्हा प्रमुख या नात्याने संदीप ठाकूर उपस्थित होते. त्यावरून माजी पदाधिकाऱ्यांचा पारा आधीच भडकला होता.

Eknath shinde
Nashik Politics : नाशिकमध्ये शिवसेना-मनसेच्या बैठकीत जोरदार राडा ; ठाकरेंच्या दोन बड्या नेत्यांमध्ये चकमक

यातच ठाकूर यांच्याकडे गडचिरोली विभागत तर राकेश बेलसरे यांच्याकडे अहेरी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या बदलामुळे वातावरण आधीच तापले होते. दादा भुसे यांनी सर्किट हाऊसमधून बाहेर पडताच ठाकूर आणि बेलसरे समर्थकांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली. त्यांनंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याने सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com