

Ashok Chavan Memory News : महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये अनेक वर्ष सोबत काम केलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने गहिरवरले. बारामतीमधील एका दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. अख्खा महाराष्ट्र या घटनेने हळहळला. बारामतीत अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत झालेली शेवटची भेट, शेवटचे हस्तांदोलन याची आठवण अशोक चव्हाण यांना झाली. नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या 'हिंद दी चादर' या गुरुगोविंदसिंह तेगबहादूर यांच्या साडेतीनशे वर्षाच्या शहिद समागम कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला येणार असल्याने राज्यातील अनेक मंत्री नांदेडमध्ये आले होते. परंतु अमित शहा यांचा नांदेड दौरा अचानक रद्द झाला. अजित पवारही येणार नव्हते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलावून घेतल्याचे सांगीतले जाते. या निमित्ताने अशोक चव्हाण आणि अजित पवार यांची झालेली भेट ही शेवटची ठरली.
25 जानेवारी, हिंद-दी-चादर, मोदी ग्राउंड, नांदेडमध्ये शेवटची भेट, शेवटचे हस्तांदोलन आणि शेवटचा निरोप, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी अजित पवारांसोबतच्या या क्षणांची पुन्हा आठवण काढली. माझे अनेक वर्षांचे सहकारी, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि तितकीच धक्कादायक आहे.
त्यांच्या निधनामुळे राज्याने एक कर्तबगार व अनुभवी नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याच्या अनेक क्षेत्रांवर त्यांची अमीट छाप आहे. प्रश्नांची सखोल जाण, खंबीर निर्णयक्षमता, प्रशासकीय कौशल्य आणि परखड वक्तृत्वशैलीसाठी ते परिचित होते.
अजित दादा पवार (Ajit Pawar) यांचे निधन माझी वैयक्तिक हानी आहे. मागील अनेक वर्ष आमचे राजकारणापलिकडचे मैत्रीचे संबंध होते. ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.