Ajit Pawar News : अजित पवारांकडून बीडकरांना गिफ्ट! 'सीट्रिपलआयटी'साठी एमआयडीसीकडून जागा, निधी देण्याचा निर्णय!

Ajit Pawar announces a major educational boost for Beed by approving land allocation and funding for an IIIT (Indian Institute of Information Technology) center : 191 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात येणार आहे. या पैकी 15% सुमारे 33 कोटी रुपये बीड जिल्हा प्रशासन उचलेल, तर उर्वरित निधी टाटा टेक्नॉलॉजी आणि तिच्या भागीदार संस्था उचलणार आहेत.
Ajit Pawar News Beed
Ajit Pawar News BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : गेल्या काही महिन्यापासून फक्त गुन्हेगारी, खंडणी, दरोडे, खून, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे राज्यात चर्चा होत असलेल्या बीड जिल्ह्यासाठी एक दिलासा देणारी गोष्ट घडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील काही शहरांमध्ये सेंटर फाॅर इन्व्हेंन्शन (CIIIT) उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये मराठवाड्यातील बीडचाही समावेश करण्यात आला होता.

आता या सीट्रिपलआयटीसाठी एमआयडीसीकडून जागा आणि निधी देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, तरुणांना कौशल्य शिक्षण दिले जाणार आहे. या संदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांनी एमआयडीसीकडून चार हजार चौरस मीटर जागा व निधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बीड येथे 'टाटा टेक्नॉलॉजी' च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड (Beed News) एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीन मधील चार हजार चौरस मीटर जागा तसंच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय 'एमआयडीसी'च्या संचालक मंडळानं घेतला आहे.

Ajit Pawar News Beed
Ajit Pawar correction : अजित पवारांनी 'ती' चूक सुधारली; पुरवणी मागण्यात एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना दिले झुकते माप

या निर्णयामुळे बीड जिह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवणं, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग खुला झाला आहे. 'एमआयडीसी' च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रा संदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Ajit Pawar News Beed
Beed sexual harassment : बीड कोचिंग क्लास लैंगिक छळ प्रकरणी मोठी अपडेट! पीडितीने बालकल्याण समितीसमोर सांगितले नराधम शिक्षकाचे विकृत चाळे

सात हजार युवकांना प्रशिक्षण

191 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात येणार आहे. या पैकी 15% म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपये बीड जिल्हा प्रशासन उचलेल, तर उर्वरित निधी टाटा टेक्नॉलॉजी आणि तिच्या भागीदार संस्था उचलणार आहेत. या केंद्रात दरवर्षी सुमारे 7,000 युवकांना आधुनिक तांत्रिक आणि औद्योगिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. CIIIT मध्ये CNC मशीन ऑपरेशन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऑटोमेशन, IoT, डेटा अ‍ॅनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स यांसारख्या अद्ययावत कोर्सेसद्वारे प्रशिक्षण या सेंटरमध्ये दिले जाणार आहे.

Ajit Pawar News Beed
NCP News : पवारांच्या लाडक्या आमदाराची कबुली; ‘साहेब अन्‌ दादांनी एकत्र यावे, अशी पवारांसह जयंत पाटील, सुळेंना विनंती केली होती’

2025 च्या एप्रिल महिन्यात बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी या CIIIT प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि टाटा टेक्नॉलॉजीला सहकार्याचं आवाहन केलं. कंपनीनेही सकारात्मक प्रतिसाद देत 191 कोटींच्या प्रकल्पाची तयारी दर्शवली. बीडमध्ये राबवला जाणारा हा प्रकल्प ही केवळ रोजगार निर्मिती नव्हे, तर जिल्ह्याच्या औद्योगिक भवितव्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com