अकोला : महानरगपालिका निवडणुकीसाठी आयोगाने मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेवरुन वाद घालणं अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे गटनेते साजिद खान पठाण यांना चांगलेच महागात पडले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशांनुसार साजिद खान पठाण यांची विरोधी पक्ष नेते पदावरुन आता हकालपट्टी करण्यात आली असून नगरसेवक डॉ. झिशन हुसेन यांची या पदावर वर्णी लागणार आहे. (Akola Municipal Corporation News)
राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी मनपा निवडणूकीच्या संदर्भाने महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र अकोल्यात महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. ही प्रभाग रचना भाजपच्या इशाऱ्याने झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रभाग रचनेचा जाब विचारण्यासाठी पठाण यांनी नगररचनाकार संदीप गावंडे व उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते या दोन अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून घेतले.
या दरम्यान गावंडे आणि देवकते यांनी साजिद पठाण यांनी आपल्याला ३ तास कक्षात बसवून ठेवत प्रश्नाचा भडिमार केला. तसेच वेठीस धरत शिविगाळ केली असल्याचा आरोप केला. सदर घटनेच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर पठाण यांच्या गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साजिद खान पठाण यांना हटवत त्यांच्या जागी डॉ. झिशन हुसेन यांचे नाव निश्चित केले आहे. तसे पत्र महापौर आणि आयुक्त यांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती आहे.
पठाण यांच्यासोबत मोहम्मद इरफान, नगरसेवक मोंटू खान, महेंद्र डोंगरे, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, नौशाद खान, गुड्डू पठाण, जमीन बर्तनवाले, फिरोज खान नवाब उर्फ बाबा यांच्याविरोधात देखील भादंवि कलम १४३, १४७, १५३ अ, १८६, १८८, २६९, ३२३, ३४२, ३५३, ४२७, ५०४, ५०६ (२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.