बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांनी पक्षातील उणीदुणी आणि स्थानिक नेतृत्वावर टीका केली.
बैठकीदरम्यान वातावरण तापले असले तरी शेवटी सर्व नेते सामोपचाराने बैठक संपवली.
या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या बीडमधील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Beed Political News : बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिकेसाठी झालेली आढावा बैठक काहीसी वादळी झाली. सुरवातीलाच एकमेकांची उणीदुणी काढली जात असल्याने वातावरण तापले होते. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच उमेदवारी द्या, नगराध्यक्ष व इतर उमेदवार व्यक्तीनिष्ठ नसावेत असा कळीचा मुद्दा काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? हे लक्षात आल्याने दुसऱ्या बाजूने नाव घेऊन टीका करू नका, अशी सूचना करण्यात आली. उण्या-दुण्याने सुरवात झालेल्या बैठकीचा शेवट नेत्यांच्या मध्यस्थीने गोड झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची बीड (Beed) नगरपालिकेबाबत पक्षाने बोलविलेल्या रविवारच्या (ता. 19) बैठकीस सुरवातीला एकमेकांचे उणे-दुणे काढण्याने सुरवात झाली. शेवटी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करून पालिकेत विजय मिळवायचा, असा सामोपचार झाला.
दोन दिवसांपूर्वी पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बोलाविलेल्या बैठकीतील माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांच्यावरील अप्रत्यक्ष टीकेचे पडसाद आज जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांनी बोलाविलेल्या बैठकीत उमटले. अॅड. चव्हाण, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बळिराम गवते, विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, फारुक पटेल, अमर नाईकवाडे, शेख निजाम, अशोक हिंगे, अविनाश नाईकवाडे, भागवत तावरे, रमेश चव्हाण, रणजित बनसोडे, भीमराव वाघचौरे, विनोद मुळूक, शुभम धूत आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष व इतर उमेदवार व्यक्तीनिष्ठ नसावेत, पक्षनिष्ठ उमेदवारांना संधी द्यावी, एकमेकांचे नाव घेऊन टीका करू नये, आम्ही पक्षाच्या व अमरसिंह पंडित यांच्या सांगण्यावरूनच विधानसभेला काम केल्याचे त्यांनी नमूद केले, असे मत अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केले. त्यांचा रोख डॉ. क्षीरसागर यांच्यावर होता. राजेश्वर चव्हाण व बळिराम गवते यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेला विकास, त्यांची दूरदृष्टी असे मुद्दे पुढे करत शहराचा कायापालट करण्यासाठी एकलिदाने लढण्याची साद घातली. तर युवकांना संधी द्यावी, असे मतही मांडले
संग्राम जगताप यांचाही मुद्दा
बैठकीत पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेबद्दलही ऊहापोह झाला. मुस्लिम समाज पक्षासोबत असताना जगताप यांची भूमिका मुस्लिम द्वेषाची असल्याने आम्हाला मान्य नसल्याचा मुद्दा फारुक पटेल यांनी मांडला. त्याला उपस्थितांनीही होकार दिला. याबाबत पक्षाला कळविण्याचा शब्द चव्हाण यांनी दिला. दिवाळीनंतर व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी राजेश्वर चव्हाण यांनी जाहीर केले.
1. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक का झाली?
स्थानिक संघटनात्मक कामकाज आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
2. बैठकीत काय घडले?
काही नेत्यांनी उणीदुणी काढत टीका केली, ज्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.
3. वाद कशावरून झाला?
पक्षातील स्थानिक स्तरावरच्या निर्णयांवर आणि नेतृत्वावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
4. शेवटी निकाल काय लागला?
वादानंतर सर्व नेत्यांनी सामोपचाराने बैठक संपवली.
5. याचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
आंतरिक नाराजी स्पष्ट झाली असली तरी पक्ष एकजुटीने पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.