Mahayuti ministers audit: फडणवीसांसह शिंदे, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; महायुतीच्या मंत्र्यांची धडधड वाढली; 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच मोठा निर्णय होणार!

Maharashtra government audit News : महायुती सरकारला डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट सुरु होणार आहे.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन लवकरच एकवर्ष पूर्ण होणार आहे. या वर्षभराच्या कालावधीत राज्य मंत्रीमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार 5 डिसेंबरला सत्तेत आले होते. त्यानंतर दहा दिवसातच भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी 15 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी शपथ घेतली होती. महायुती सरकारला डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट सुरु होणार आहे.

वर्षभरापूर्वीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन मित्र पक्षाने घवघवीत यश संपादन केले होते. महायुतीला 288 पैकी 232 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली होती.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
BJP Politics : भाजपचे आमदार जीवाच्या आकांताने पक्षात हवा भरतायत... शिंदे-अजितदादा हळूच टाचणी लावतायत

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जवळपास 42 मंत्री आहेत. त्यामध्ये भाजपचे 19 जण तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे 10 जण तर शिवसेना शिंदे गटाचे 11 जण मंत्री आहेत. तीन मित्रपक्षातील जवळपास 40 मंत्र्यांनी 15 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी शपथ घेतली होती. या सर्व मंत्र्यांना लवकरच एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट सुरु होणार आहे. राज्यात सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हे ऑडिट सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
BJP Politics : भाजपचे आमदार जीवाच्या आकांताने पक्षात हवा भरतायत... शिंदे-अजितदादा हळूच टाचणी लावतायत

महायुती सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळात देखील कोणताही बदल होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट घेतल्यानंतर व त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. या मंत्र्यांकडून सुरुवातीलाच 100 दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी नाशिकला पुन्हा येईल, भगवा फडकवुनच जाईल'

महायुती सरकारने प्रारंभी 100 दिवसांच्या कालावधीत प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. त्यावेळी या मंत्र्यांनी आपल्या खात्यात काय प्रगती केली, कोणते प्रकल्प राबवले आणि जनतेच्या समस्या कितपत सोडवल्या याचा तपशीलवार अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर सविस्तर कामगिरीचे मूल्यमापन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Sharad Pawar NCP : शरद पवारांचा झुंजार नेता हरपला! माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राज्यातील मंत्र्यांचा हा आढावा वर्षभरानंतर घेण्यात आला आहे. त्यामध्ये अधिक सखोल आणि आकडेवारी आधारित माहिती त्यामध्ये असण्याची शक्यता आहे. विविध विभागांच्या योजनांचा प्रगती अहवाल, निधी वापर, लोकाभिमुख निर्णय, आणि जनतेपर्यंत पोहोचलेली अंमलबजावणी या सर्व बाबींवर या अहवालात प्रकाश टाकला जाणार आहे. या अहवालांवरून मंत्र्यांच्या कामगिरीचे पुनरावलोकन होणार आहे. या माध्यमातून कामाचे ऑडिट झाल्यानंतर आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी सरकारची कामगिरी लोकांसमोर ठोस स्वरूपात मांडणे शक्य होणार आहे, त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
BJP Pune: वात पेटली! भाजप नेत्यानं पोलीस ठाण्यातच तालुकाध्यक्षांच्या विरोधात फोडले फटाके!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com