
Mumbai News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. त्यातच एक मोठी अपडेट मंगळवारी समोर आली. अनेक दिवसांच्या मागणीनंतर अखेर खंडणी आणि देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला आहे. आता कराडवर मकोका लावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.14)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्याप्रकरणात मकोका दाखल झालेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोठं भाष्य केलं.ते म्हणाले, दिवंगत संतोष देशमुख यांचं कुटुंब मग त्यात त्यांची मुलगी ,पत्नी किंवा मग भाऊ असेल हे तपास अधिकाऱ्यांना भेटत आहे.
या तपासात पुढे काय होतंय की नाही,याबाबत त्यांचं कुटुंब चिंतेत आहे. वास्तविक पोलिस यंत्रणा त्यांचं काम करत आहे,सीआयडी,एसआयटीमार्फत अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहे.न्यायाधीशांच्या मार्फतही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
याबाबत स्वत:मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे.आम्ही सगळ्यांनी याप्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली आहे, जो कोणी माणूस दोषी असतील, त्यांना अजिबातच थारा देणार नाही. ही निर्घृण हत्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुणीही खपवून घेणार नाही. हा महाराष्ट आहे. त्यामुळे कोणीही दोषी असेल त्याचे धागेदोरे चौकशीत मिळाले तर त्यांच्यावर अॅक्शन घेतली जाणार असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिला.
अजित पवार म्हणाले, ही घटना अतिशय निर्घृण आहे.अशा घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही. यात कोणीही मग तो सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा असेल.किंवा कुणी त्रयस्थ असेल ज्याचा राजकारणाशी संबंध असेल वा नसेल,त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही. कुणाचीही गय केली जाणार नाही.मग त्याचे कुणासोबतही संबंध असले तरी त्याला सोडायचं नाही असं एकनाथ शिंदे यांनीही याविषयी सातारा येथे बोलले आहेत.
तिथे जे एसपी पाठवलेत ते अतिशय कडक आहे.तुम्ही कुणालाही विचारा,ते कडक आहेत की नाही.त्यांना आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तिथं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिलं आहे,असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.