Walmik Karad : "माझ्या लेकाला..."; सुरेश धस, क्षीरसागर अन् बजरंग सोनवणेंवर वाल्मिक कराडच्या आईचा खळबळजनक आरोप

Walmik Karad's Mother Parubai Karad Allegations : वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड (वय.75) या परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. यावेळी त्यांनी माझा मुलगा निर्दोष असल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवाय त्याला मुद्दाम या सर्व प्रकरणात अडकवलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Suresh Dhas, Bajrang Sonwane, Sandeep Kshirsagar, Walmik Karad Mother
Suresh Dhas, Bajrang Sonwane, Sandeep Kshirsagar, Walmik Karad MotherSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 14 Jan : वाल्मिक कराड सध्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत आहे. मंगळवारी (ता.14) त्याची 14 दिवसांची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याला केज येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. मात्र, वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा नव्हे तर हत्येचा गुन्हाही दाखल करावा अशी मागणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.

शिवाय कराड हाच या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप देखील देशमुख कुटुंबियासह भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून केला जात असतानाच वाल्मिक कराडच्या आई पारूबाई कराड यांनी सुरेश धस यांच्यासह संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड (वय.75) या परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. यावेळी त्यांनी माझा मुलगा निर्दोष असल्याचं वक्तव्य केलं आहे. माझा लेक देवमाणूसशिवाय त्याला मुद्दाम या सर्व प्रकरणात अडकवलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

माझा लेक देवमाणूस

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या लेकाला निर्दोष सोडावं ही माझी मागणी आहे. त्याच्यावर जे काही आरोप केले जात आहेत. ते सर्व खोटे आहेत. असं म्हणतानाच त्यांनी कोण क्षीरसागर आहे त्याला अटक करा आणि माझ्या लेकावरील गुन्हा मागे घ्या, अशी मागणी केली. तर सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) हे विनाकारण माझ्या लेकाने काही गुन्हा केला नसताना मुद्दाम अडकवत आहेत.

Suresh Dhas, Bajrang Sonwane, Sandeep Kshirsagar, Walmik Karad Mother
Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तापलेल्या बीडबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आज मध्यरात्रीपासून...

माझा लेक देवमाणूस आहे हे सगळ्या परळीला माहिती आहे, त्यामुळे धस, सोनवणे आणि क्षीरसागर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या लेकाला निर्दोष सोडल्याशिवाय माझा जीव गेला तरी मी इथून उठणार नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. तर आता वाल्मिक कराडचे समर्थक देखील आक्रमक झाले असून त्यांनी टायर जाळून आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. तसंच त्यांनी आता सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील सरकारला दिला आहे.

Suresh Dhas, Bajrang Sonwane, Sandeep Kshirsagar, Walmik Karad Mother
Walmik Karad Video : "...तोपर्यंत मी उठणार नाही" वाल्मिक कराडची पाठराखण करण्यासाठी 75 वर्षाच्या आईचं ठिय्या आंदोलन, म्हणाली...

दरम्यान, सोमवारी (ता.14) संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तर वाल्मिक कराडवर (Walmik Karad) केवळ खंडणीचा नव्हे तर हत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आणि स्वत:ला संपवून घेण्याचा इशारा देत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यानंतर प्रशासनाने समजूत काढल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. शिवाय सीआयडीच्या तपासावर संशय व्यक्त केल्यामुळे आधीची सीआयडी (CID) बरखास्त करून नवी सीआयडी स्थापन करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com