Sharad Pawar Vs Ajit Pawar : कुणी कितीबी करा रे हल्ला, माहूर-किनवटमध्ये 'या' पठ्ठ्याचाच मजबूत किल्ला!

Mahur Kinvat NCP : प्रदीप नाईकांमुळे शरद पवारांवर अजित पवारांची कुरघोडी करण्याचा प्रयत्न फोल...
Pradeep Naik, Sharad Pawar
Pradeep Naik, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

साजीद खान

Naded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राज्यातील अनेक विधानसभेतील आजी-माजी शिलेदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ देणे पसंत केले. ठिकठिकाणी अजित पवारांचा गट मजबूत होत असताना नांदेडमधील माहूर-किनवट मात्र त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात काही पदाधिकाऱ्यांनी येथील ज्येष्ठ नेते शरद पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यामुळे त्यांच्या हाताला काही लागले नाही. नाईकांनी सुरुवातीपासूनच शरद पवारांची साथ दिल्याने अजित पवारांनी केलेली कुरघोडी येथे फोल ठरल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

माहूर-किनवट विधानसभेत प्रदीप नाईक यांची पकड मजबूत आहे. त्यांनी तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि हजारो कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्या बाजूने ठाम आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ‘भाया’ कार्डच चालणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष तथा जिल्हा संघटक फिरोज दोसानी यांनी सांगितले आहे.

Pradeep Naik, Sharad Pawar
Maratha Vs OBC : उपकाराची भाषा करत जरांगे पाटलांचे छगन भुजबळांना आवाहन; म्हणाले, 'ओबीसी नेत्यांनो परतफेड...'

नांदेड जिल्ह्यात किनवट-माहूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील माजी आमदार प्रदीप नाईकांच्या एकहाती वर्चस्वामुळे या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाईकांची राष्ट्रवादी म्हणूनही ओळखले जाते. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सेवा सोसायट्या ते ग्रामपंचायतपर्यंत निर्विवाद प्राबल्य होते. गत निवडणुकीत प्रदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाची कारणे शोधून प्रदीप नाईक यांनी नव्याने पक्षबांधणी केली आहे. याची धास्ती प्रमुख सत्ताधारी पक्षांनी घेतली आहे.

Pradeep Naik, Sharad Pawar
Anant Geete News : शिंदे सरकारला सुप्रीम कोर्ट रोज जोडे मारतंय, सरकार कात्रीत सापडलंय; अनंत गीतेंचा हल्लाबोल

माहूर-किनवटमधील शरद पवार समर्थक नाईकांच्या वर्चस्वाला सुरुंग सत्ताधाऱ्यांनी रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाने माहूर येथे बैठक घेऊन काही मोजक्या लोकांचा प्रवेश करवून घेतला. मात्र, तो मोठ्या प्रमाणात रंगवण्यात आला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन असे कटकारस्थान रचण्यात येत असल्याचे नाईकांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रदीप नाईक यांचे सच्चे कार्यकर्ते काल, आज आणि उद्याही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 'माहूर तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करून त्याचा फायदा घेण्यासाठी काही पक्ष संधी शोधत आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी आलेल्या पक्षाचे हे बुजगावणे आहेट,' अशी टीका माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Pradeep Naik, Sharad Pawar
Ahmednagar Politics : शंकरराव गडाखांची सावध भूमिका, नगर दक्षिण लोकसभेसाठी 'मविआ'चा उमेदवार कोण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com