Ajit Pawar News : पहाटेच रस्त्यावर अन् वेगवान आढावा ; अजित पवारांच्या कामाचा धडाका बीडकरांनीही अनुभवला!

Deputy CM Ajit Pawar’s work ethic impacts Beed as he hits the roads at dawn for a fast-paced on-ground review. : बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत बीडकरही खंबीरपणे आमच्यासोबत आहेत. बीड लवकरच विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल
Ajit Pawar In Beed News
Ajit Pawar In Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed NCP News : स्पष्टवक्ते, रोखठोक आणि कामाचा धडका यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडी, त्यातून झालेले राजकीय बदल व त्यातून बीडचे पालकत्व मंत्री म्हणून अजित पवार यांनी स्वीकारले. तेव्हापासून ते जेव्हा जेव्हा बीडमध्ये आले त्या प्रत्येक वेळी त्यांनी या जिल्ह्याची प्रतिमा विकासकामातून बदलण्याचा जणू विडाच उचलला आहे. एकदा एखाद्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले तर मग अजित पवार मागे हटत नाही, याचा अनुभव बारामतीकरांनंतर आता बीडकरांना देखील येऊ लागला आहे.

कालपासून बीड दौऱ्यावर असलेले अजित पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत. अगदी पहाटेच रस्त्यावर उतरत विकासकामांची पाहणी, देवदर्शन, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बैठकांचा धडाका सुरू असल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाची पद्धत, त्यातील शिस्त आणि वक्तशीरपणाची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात होत आहे. बीड दौऱ्यावर असताना आज पहाटेच अजित पवारांनी श्री क्षेत्र कंकालेश्वर मंदिरात जाऊन भक्तिमय वातावरणात महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील शेतकरी-कष्टकरी सुखी-समाधानी राहावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत बीडकरही खंबीरपणे आमच्यासोबत सहभागी आहेत. त्यामुळं प्रत्येक वळणावर त्यांचं सहकार्य आमच्यासोबत असेल आणि बीड लवकरच विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वास या निमित्ताने अजित पवार व्यक्त करताना दिसत आहेत. बीड (Beed News) येथील महसूल भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.

Ajit Pawar In Beed News
Ajit Pawar : अजितदादांनी धाराशिवमध्ये मारले एकाच दगडात दोन पक्षी; राहुल मोटेंना टाळी तर तानाजी सावंतांच्या वर्चस्वाला धक्का?

ही नवी वास्तू जनसामान्यांच्या सेवा-सुविधांसाठी उपयुक्त ठरणार असून शहराच्या विकासातही मोलाची भूमिका बजावेल. ही इमारत बीडच्या सौंदर्यात भर घालणारी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं काम दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण झालं पाहिजे, याकडे अजित पवार यांनी कटाक्षाने लक्ष दिले. शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचीही अजित पवारांनी पाहणी केली. शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

Ajit Pawar In Beed News
पंकजांना धक्का, बॅनरवरून धनुभाऊंचा फोटो गायब? बाबरी मुंडेंनी सगळं सांगितलं, Babri Munde | Beed News

परिसर स्वच्छ ठेवा, कचरा नको..

प्रत्येक प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कामांची गुणवत्ता, टिकावूपणा आणि वेळेचं नियोजन यावर भर द्यावा, असे स्पष्ट आदेश अजित पवारांनी यावेळी दिले. बीडच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार कामं करावी. विकासकामं करताना ती कामं गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या, असेही अजित पवार म्हणाले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामामुळे बीडकर नागरिकांना सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, क्रीडा संकुलालगत असलेला संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही याबाबत नगरपालिका प्रशासनानं दक्षता घ्यावी, अशा सूचना अजित पवारांनी संबंधितांना दिल्या.

Ajit Pawar In Beed News
NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. इमारतीची कामं करताना आगामी 50 वर्षांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. वीज, वाहनतळ, अग्निशामन यंत्रणा, सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटेल, असं कामं झालं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. एकूणच बीड शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com