NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

NCP SP News : विधानसभा निवडणुकीत गद्दारी केलेल्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
Dr. Nandatai Babhulkar resumes grassroots outreach in Chandgad
Dr. Nandatai Babhulkar resumes grassroots outreach in ChandgadSarkarnama
Published on
Updated on

NCP SP News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञातवासात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहिलेल्या डॉ. नंदाताई बाभुळकर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाभूळकर यांनी चंदगड तालुक्याचा दौरा सुरु केला आहे. यातीलच एका मेळाव्यात त्यांनी ज्यांनी विधानसभा निवडणुकीत गद्दारी केली त्यांना घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

चंदगड तालुक्यातील कानडेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना डॉ. बाभूळकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी जीवाचे रान केले. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काहींनी मला एकाकी पाडले. गद्दारी करत फसवणुकीचे राजकारण केले. पाठीत खंजीर खुपसला. पण अशांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

शरद पवार अडचणीत असताना आम्ही लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विश्वासाने विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी दिली. 50 हजार मतांपर्यंत आम्ही पोहोचलो. यामुळे मतदारसंघातील आमची ताकद दाखवून दिली आहे. यापुढेही दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्यापासून आजअखेर कुपेकर घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही डॉ. बाभुळकर यांनी दिली.

Dr. Nandatai Babhulkar resumes grassroots outreach in Chandgad
Kolhapur Politics : स्थानिकच्या निवडणुकांमध्ये कमळ अन् घड्याळासमोरील बटण दाबा, अजितदादांच्या शिलेदाराने शिवसेनेचं नावं घेणं टाळलं, चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना योग्य पदावर बसविण्यासाठी जीवाचे रान करून निवडणुका लढणार आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे. मी कुठेही जाणार नाही. त्यांच्यामागे ताकदीने उभारणार आहे. जिल्ह्याच्या नेत्यांनाही आमच्या ताकदीची दखल घ्यावी लागेल. कार्यकर्त्यांना संधी देण्याची ही वेळ असून, त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळूनसुद्धा मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांची गय आता करणार नाही, असा इशारा डॉ. बाभुळकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com