Ajit Pawar On Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या आदळाआपटवर अजितदादांचे सूचक विधान; म्हणाले, ‘...तर राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील’

Ajit Pawar's suggestive statement : सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (ता. 03 मे) मोठा त्रागा केला होता. सामजिक न्याय विभागाच बंद करून टाका, अशी आदळाआपट सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी केली होती.
Ajit Pawar-Sanjay Shirsat
Ajit Pawar-Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 04 May : सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (ता. 03 मे) मोठा त्रागा केला होता. सामजिक न्याय विभागाच बंद करून टाका, अशी आदळाआपट सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी केली होती. त्यावर छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी अत्यंत सूचक भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी शहरातील वनस्पती उद्योनाला भेट देऊन तेथील लागवड केलेल्या रोपट्यांची आणि झाडांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी शिरसाटांच्या नाराजीचा चेंडू अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शनिवारी करत माझे खाते बंद करून टाका, असा त्रागा व्यक्त केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी त्यांनी सूचक विधान केले. तर राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील, असे अवघ्या चार शब्दांत उत्तर दिले आहे.

Ajit Pawar-Sanjay Shirsat
Maharashtra Politic's : 'अजित पवारसाहेब तुमच्यात धमक आहे, टाका पुढचं पाऊल, आम्ही तुमच्यासोबत आहोत';दादांना कोणी दिला सल्ला?

संजय शिरसाट यांच्याबाबत चेंडू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलवला आहे. आता या वादावर मुख्यमंत्री फडणवीस हे काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शिरसाटांचे विधान मुख्यमंत्री किती गांभीर्याने घेतील, याची उत्सुकता आहे.

Ajit Pawar-Sanjay Shirsat
Narendra Patil : नरेंद्र पाटलांचा आपल्याच सरकारवर हल्लाबोल; ‘मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री चांगले; मग आम्हाला न्याय का मिळत नाही?’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील पाडेगाव परिसरातील वनस्पती उद्यानाची पाहणी केली. उद्यानातील विविध झाडांची उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती जाणून घेतली. या वेळी अजितदादांनी ‘उद्यानात मजुरी करणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे आले का? अशी विचारणाही केली. काहींनी नाही म्हणून सांगताच आठवडाभरापूर्वीच तुमचे या महिन्यांचे पैसे पाठवले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com