Sanjay Shirsat On Babri : बाबरी पाडायला गेले ते सगळे कारसेवक, त्यांना पक्षाच्या चौकटीत आणू नका..

Chhatrapati Sambhajinagar : चंद्रकात पाटील यांनी बाबरी संदर्भातील वक्तव्य करायला नको होते.
Sanjay Shirsat On Babri News
Sanjay Shirsat On Babri NewsSarkarnama

Shivsena : बाबरी मशीद पाडली तेव्हा तिथे एकही शिवसैनिक नव्हता, बाळासाहेब ठाकरे यांचा देखील या आंदोलनाशी संबंध नव्हता, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्राकंत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. याचे राजकीय पडसाद आता उमटायला लागले आहेत. ठाकरे गट भाजप व शिंदे गटावर तुटून पडलेला असतांना आता आमदार संजय शिरसाट यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Shirsat On Babri News
Ambadas Danve Reaction On Babri: बाळासाहेबांचा बाबरीशी संबंध नाही सांगणारे, आम्ही पानीपतच्या लढाईत लढलो असेही सांगतील..

बाबरी पाडताना तिथे शेकडो शिवसैनिक होते, परंतु बाबरी पाडण्याचे आंदोलन हे कोणत्याही एक पक्षाचे नव्हते, तर ते राम भक्तांचे, समस्थ हिंदूंचे होते. (Shivsena) अयोध्येत तेव्हा कारसेवा झाली होती, त्याला कोणत्याही राजकीय चौकटीत बांधू नका. चंद्रकात पाटील यांनी बाबरी संदर्भातील वक्तव्य करायला नको होते. रामल्लांचा राजकारणासाठी वापर केला जावू नये, अशी अपेक्षा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केली.

राम जन्मभूमीचे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे नव्हते. देशभरातील हिंदू या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे याला पक्षाच्या चौकटीत आणणे चुकीचे ठरेल. ज्यांनी राम मंदिराच्या आंदोलनात आपले प्राण गमावले त्यांचाही तो अपमान ठरेल. तेव्हा कारसेवा झाली म्हणून आज राम मंदिर उभे राहत आहे.

मोरेश्वर सावे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कारेवक त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या सगळ्या आंदोलन प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांना याचा बहुदा विसर पडला असेल, असा चिमटा देखील शिरसाट यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com