Ambadas Danve Reaction On Babri: बाळासाहेबांचा बाबरीशी संबंध नाही सांगणारे, आम्ही पानीपतच्या लढाईत लढलो असेही सांगतील..

Marathwada News: बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची प्रतिमा, कर्तृत्व लोकांच्या मनातून पुसण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasheb Thackeray) यांच्या निधनानंतर (२०१२) त्यांची प्रतिमा, कर्तृत्व लोकांच्या मनातून पुसण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. २०१४ साली शिवसेनेशी युती तोडणे हा त्याच खेळीचा भाग होता, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भाजप नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मस्जिदीबाबत मोठा खुलासा केला होता.

Ambadas Danve News
Chandrakant Patil News: ''...म्हणून उध्दव ठाकरेंना फोन करणार!''; राजकीय गदारोळानंतर चंद्रकांत पाटलांचा सूर बदलला

बाबरी पाडण्याच्या घटनेशी शिवसेनेचा (Shivsena) काहीही संबंध नाही. तिथं ना शिवसैनिक होते, ना बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेबांनी केवळ जबाबदारी घेतली होती, पण एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता असं विधान त्यांनी केले होते. (Chandrakant Patil) त्यानंतर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याचीच मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ते जर राजीनामा देत नसतील तर तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, असेही ठाकरे म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपली भूमिका मांडली. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दानवे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर (२०१२) त्यांची प्रतिमा, कर्तृत्व लोकांच्या मनातून पुसण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. २०१४ साली शिवसेनेशी युती तोडणे हा त्याच खेळीचा भाग होता. चंद्रकांत पाटील यांचे आजचे वक्तव्य म्हणजे ही कृतघ्नता असून ती लोकांना खपणारी नाही. मुळात यांच्यासारखे माणसं सरकारात असताच कामा नये.

मिंधे गट यावर आता काय बोलणार, की आता सगळे बोटं चेपले आहेत ? सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आम्हाला म्हणता, तुम्ही तर चक्क बाळासाहेब सोडले! जनता हिशेब करेलच. १९९२ साली बालवाडीत शिकणारे आज सांगतात आम्ही कारसेवेत होतो. थोड्या दिवसाने भाजप हे पण सांगेल की आमचे संपूर्ण केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ पानिपतच्या लढाईत लढले होते. खोटेपणाची, अपमानित करण्याची हद्दच झाली, असा संताप दानवे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com