Jayant Patil News : ही लढाई एकतर्फी नाही : निवडणुकीबाबत जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे हा प्रवास सोपा नाही.
 Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : ‘‘राज्यात आपल्याला बदल घडवायचा आहे. मात्र, हा बदल सहजासहजी घडणार नाही. निवडणूक जवळ येताच आपल्याला प्रलोभने दाखवली जातील, परंतु त्याला न भूलता आपण योग्य भूमिका घ्यायला हवी. निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे हा प्रवास सोपा नाही, ही लढाई एकतर्फी नाही. आपण योग्य जम बसवला तरच यश नक्कीच आपल्या पदरात पडेल,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. (This battle is not one sided: Jayant Patil's warning to NCP workers)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज ‘राष्ट्रवादी पुन्हा’ दौऱ्यादरम्यान जळगाव येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात आपल्या पक्षाला चांगली संधी आहे. आपली यंत्रणा विरोधी पक्षापेक्षा अधिक चांगली पाहिजे. जळगाव जिल्ह्यात आधीपेक्षा चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

 Jayant Patil
Sambhaji Raje On Sawant : मग्रूर, निर्ढावलेल्या तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या; अन्यथा.... : संभाजीराजेंचा सरकारला इशारा

बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर द्यायला हवा. या बूथ कमिट्यांद्वारे आपले विचार लोकांपर्यंत पोहचवता येतील. सरकारच्या चुकीच्या गोष्टी लोकांना सांगा. मतदारांना जागृत करा. महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवा, अशा सूचना जयंत पाटील यांनी या वेळी दिल्या.

 Jayant Patil
Ramesh Baraskar News: राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न; मोहोळमध्ये खळबळ

पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि अजूनपर्यंत मिळत आहे. तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला चांगला निकाल मिळू शकतो.

 Jayant Patil
Theft in Umesh Patil's Bungalow: राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या बंगल्यात चोरी

या वेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, जळगाव शहराध्यक्ष अशोक लाड वंजारी, महिलाध्यक्ष वंदना चौधरी, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष अरविंद मानकरी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com