Ambadas Danve News: 'इव्हेंटबाजी' थांबवा, दावोसमधील गुंतवणूक अन्...; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ambadas Danve Davos Demand : दावोस दौऱ्यातील गुंतवणूक आणि रोजगार दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
Shivsena UBT leader Ambadas Danve addressing media, questioning Davos investment claims and demanding transparency from the Maharashtra government.
Shivsena UBT leader Ambadas Danve addressing media, questioning Davos investment claims and demanding transparency from the Maharashtra government.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांचा दरवर्षी होणारा दावोस दौरा यातून राज्यामध्ये आलेल्या गुंतवणुकीपेक्षा यातील आकडे आणि त्याच्या सत्यतेवरूनच अधिक चर्चेत येतो. सत्ताधारी महायुतीकडून कोट्यावधींची गुंतवणूक आणि हजारो-लांखो रोजगारांच्या संधीचा दावा केला जातो. तर त्यावर विरोधक तुटून पडतात आणि महाराष्ट्रातील उद्योजकांचीच गुतंवणूक दाखवून सत्ताधारी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप करतात.

सध्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. दररोज हजारो, लाखो कोटींच्या गुतंवणुकीचे करार आणि त्यातून लाखो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत. यावर विरोधक बारकाईने लक्ष ठेवून असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी दावोसमधील गुंतवणुकींच्या आकड्यांवर आक्षेप नोंदवत सरकारकडे काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.

शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार प्रश्न विचारले आहेत. दावोसची गुंतवणूक हा केवळ आकड्यांचा फुगा आहे की वास्तव? असा सवाल त्यांनी केला आहे. दरवर्षी दावोसला जाऊन लाखो कोटींच्या करारांची 'कॅसेट' वाजवली जाते. पण जमिनीवर काय स्थिती आहे? मुख्यमंत्र्यांनी या 4 प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत, असे दानवे यांनी म्हटले आहे.

1. 'न्यू एरा क्लीनटेक'चा पत्ता कुठे? 2023 मध्ये चंद्रपूरसाठी 15000 रोजगारांची घोषणा झाली. 2 वर्ष झाली, पण प्रकल्पाची एक वीटही रचली नाही! ही गुंतवणूक कागदावरच राहिली का? विदर्भातील तरुणांची ही दिशाभूल नाही का?

2. स्वदेशी कंपन्यांसाठी दावोसची वारी कशासाठी? लोढा, रहेजा, पंचशील, SBG - या कंपन्यांची कार्यालयं महाराष्ट्रातच आहेत. मग त्यांच्याशी करार करण्यासाठी कोट्यवधी खर्चून स्वित्झर्लंडला जाण्याची गरज काय? केवळ परकीय गुंतवणुकीचा (FDI) आकडा फुगवण्यासाठी हा इव्हेंट आहे का?

Shivsena UBT leader Ambadas Danve addressing media, questioning Davos investment claims and demanding transparency from the Maharashtra government.
Latur Mayor: लातूरच्या महापौरपदासाठी 3 नावे चर्चेत; भाजपला भिडणारे आक्रमक चेहरे रेसमध्ये : अमित देशमुख कोणाचे नाव फायनल करणार?

3. बँकांच्या तिजोरीला भगदाड पाडण्याचा डाव? 'सुरजगड इस्पात' सारख्या प्रकल्पांच्या MoUs मुळे कंपन्यांना बँकांकडून मोठं कर्ज मिळतं. पण प्रकल्प रखडले तर जनतेच्या पैशांचं काय? कंपन्यांच्या आर्थिक क्षमतेची तपासणी न करता बँकांना 'भगदाड' पाडण्यास सरकार वाव देत नाहीये ना?

Shivsena UBT leader Ambadas Danve addressing media, questioning Davos investment claims and demanding transparency from the Maharashtra government.
Mayor Reservation : महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर, पुण्यात महिलाराज तर मुंबईत..., 29 महापालिकांची संपूर्ण यादीच वाचा

4. आजवरच्या करारांचा 'कन्व्हर्जन रेट' किती? करार मोडणाऱ्या कंपन्यांनी काय कारणं दिली? किती तरुणांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली? असे प्रश्न दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी आता इव्हेंटबाजी थांबवून 'गुंतवणूक आणि रोजगार' यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही दानवे यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com