Latur Mayor: लातूरच्या महापौरपदासाठी 3 नावे चर्चेत; भाजपला भिडणारे आक्रमक चेहरे रेसमध्ये : अमित देशमुख कोणाचे नाव फायनल करणार?

Latur Mayor Reservation SC Woman : लातूर महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले असून काँग्रेसच्या मनीषा बसपुरे, कांचन अजनीकर आणि जयश्री सोनकांबळे यांच्यात चुरस वाढली आहे.
Congress leaders Manisha Baspure, Kanchan Ajnikar and Jayshree Sonkamble, who are leading contenders for the Scheduled Caste woman Mayor post in Latur Municipal Corporation after reservation announcement.
Congress leaders Manisha Baspure, Kanchan Ajnikar and Jayshree Sonkamble, who are leading contenders for the Scheduled Caste woman Mayor post in Latur Municipal Corporation after reservation announcement.Sarkarnama
Published on
Updated on

Latur Municipal Corporation: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर मुंबईत या पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यात लातूरचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.

आता महापौरपदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या मनीषा बसपुरे, कांचन अजनीकर व जयश्री सोनकांबळे या असणार आहेत. यासोबतच ज्यांच्या सोबतीने स्पष्ट बहुमत मिळाले त्या वंचित बहुजन आघाडीला हे पद काँग्रेस देणार का? अशी चर्चा लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी काहींनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्यालाच हे पद द्यावे याकरिता फिल्डिंग लावली होती. काही समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींनी नेत्यांच्या भेटी घेऊन दबाव तंत्रही सुरू केले होते. पण या सर्वांच्या आशा, आकांक्षावर आरक्षण सोडतीनंतर पाणी फेरले गेले आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी हे आरक्षण सुटले आहे. त्यामुळे महापालिकेवर पहिल्यांदाच या प्रवर्गातील महिला महापौरपदी विराजमान होणार आहे.

अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या महिला उमेदवार काँग्रेसकडे आहेत. त्यात प्रमुख प्रभाग 3 मधील मनीषा संभाजी बसपुरे या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुनीता आवचारे यांचा दोन हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला होता. या प्रवर्गातून सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत त्यांचा दावा आहे.

प्रभाग 10 मधील कांचन रत्नदीप अजनीकर या देखील महापौरपदाच्या दावेदार असणार आहेत. सलग दोनवेळा त्या नगरसेवक झाल्या आहेत. या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पूजा सचिन कांबळे यांचा पराभव केला होता. अजनीकर यांना 1063 चे मताधिक्य आहे. प्रभाग 12 मधील जयश्री सोनकांबळे यासुद्धा प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका गायकवाड यांचा पराभव केला. सोनकांबळे केवळ 175 मतांनी विजयी झाल्या आहेत. पण त्यासुद्धा आता महापौरापदाच्या शर्यतीत आहेत.

Congress leaders Manisha Baspure, Kanchan Ajnikar and Jayshree Sonkamble, who are leading contenders for the Scheduled Caste woman Mayor post in Latur Municipal Corporation after reservation announcement.
Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत महापौर पदाचा पहिला मान स्त्री शक्तीला; 'या' आहेत रेसमध्ये..

महापौर काँग्रेसचाच..

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी झाला. 70 पैकी 43 उमेदवार विजयी झाले. तर वंचित बहुजन आघाडीचे देखील पाचपैकी चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला महापौरपद द्यावे, अशी चर्चाही पक्षात सुरू आहे. पण एकूण राजकीय घडामोडीत हे सध्या तरी अशक्य असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचाच महापौर होईल, असे पक्षातील कार्यकर्ते सांगत आहेत.

Congress leaders Manisha Baspure, Kanchan Ajnikar and Jayshree Sonkamble, who are leading contenders for the Scheduled Caste woman Mayor post in Latur Municipal Corporation after reservation announcement.
Latur Congress: लातूर महापालिकेत विजयाचा झेंडा, काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाची चाचपणी? भाजपची काय भूमिका?

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत एकहाती सत्ता आणली आहे. निवडणुकीत वंचितला सोबत घेतले असले तरी वंचितचे उमेदवार विजयी करण्यात देशमुख यांचा मोठा वाटा राहिला आहे. अमित देशमुख हेच महापौरपदाचा उमेदवार ठरवतील. त्यांचाच निर्णय अंतिम राहणार असून, त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com