Ambadas Danve News : मराठी उद्योजकांना सापत्न वागणूक, ते दुसऱ्या राज्यात जातायेत..

Maharashtra : तेलंगणा, गुजरात, राजस्थान आदी राज्यात उद्योगांना पोषक वातावरण दिल जाते, त्याचा आदर्श घेण्याची आवश्यकता.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session : विकसनशील, प्रगतशील अशा महाराष्ट्रात उद्योगधंद्यांच्या वाढीस चालना मिळावी यासाठी मैत्री बिलाअंतर्गत उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक असावी. (Ambadas Danve News) इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात उद्योगांना जास्तीतजास्त सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली. उद्योग विभागाने मांडलेल्या मैत्री बिलावर दानवे बोलत होते.

Ambadas Danve News
Bhai Jagtap News : अदानीचे नाव आले की केंद्र, राज्य सरकार नतमस्तक का होते ?

दुसऱ्या राज्यांत उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या या २४ तासात दिल्या जातात. मात्र आपल्या राज्यात ६ ते ८ महिने उद्योजकांना परवानग्या घेण्यासाठी थांबावे लागते. (Maharashtra) त्यांना परवानग्या काढण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत ही उद्योजकांची खंत आहे.

उद्योग सुरू करण्याच्या परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे सादर केल्यावरही आपले संबंधित अधिकारी त्यांना चारचार वेळा फेऱ्या मारायला सांगतात. (Industries) यामुळेच उद्योजक आपले उद्योग बाहेरच्या (Shivsena) राज्यात घेऊन जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

तेलंगणा, गुजरात, राजस्थान आदी राज्यात कशाप्रकारे उद्योगांना पोषक वातावरण दिल जाते, त्याचा आदर्श आपल्या राज्याने घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात उद्योगांना सवलती दिल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी उद्योग विभागाने मांडलेले मैत्री बिल प्रभावी झाले पाहिजे. इतर राज्याच्या तुलनेत आपल्याकडे असलेल्या उद्योगांना वीज अतिशय महागड्या दराने दिली जाते.

त्यामुळेच अनेक उद्योजकांनी स्वतः वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मैत्री बिल हे केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.आपल्या राज्यातील मराठी उद्योजकांना राज्यात सापत्न वागणूक मिळत असल्याने ते आपले उद्योग हे झारखंड, रायपूर याठिकाणी नेतात, असा आरोपही दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com