Shivsena : गद्दारी करूनही मंत्रीपद मिळत नसल्याने संजय शिरसाट हे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यातूनच ते बडबड करत असतात. माझे त्यांच्याकडे काय काम? म्हणून मी त्यांना फोन करेन, असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आरोप फेटाळून लावला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल त्यांनी केलेली टीका ही शिरसाटांची संस्कृती आहे.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) महिला नेत्यांचा अपमान करण्याची स्पर्धाच मिंधे गटात सुरू असल्याचा टोला देखी दानवे यांनी लगावला. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अंबादास दानवे यांनी आपल्या फोन करून सुषमा अंधारे या डोक्याच्यावर जात असल्याचे सांगितल्याचा दावा केला होता. यावरून दानवे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.
यावर आज अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण देत आपण संजय शिरसाट यांना कधीही फोन केला नसल्याचे सांगतिले. दानवे म्हणाले, संजय शिरसाट यांना मंत्री होण्याची इच्छा आहे, गेल्या दोन-तीन वर्षापासून ते त्यासाठी प्रयत्न करतायेत. अगदी मंत्रीपदासाठीच त्यांनी गद्दारी देखील केली, मात्र तरीही त्यांना मंत्रीपद काही मिळाले नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये असून नको ती बडबड करत आहेत.
सुषमा अंधारे या आमच्या उपनेत्या आहेत, महिलांच्या बाबतीत असभ्य भाषेत बोलंण ही शिरसाटांची आणि मिंधे गटातील नेत्यांची संस्कृतीच आहे. याआधी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्यामुळे शिरसाटांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही दानवे म्हणाले. सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी वैफल्यातून केल्याचे सांगतांनाच कांदेचे वांधे झाले आहेत, असा चिमटाही दानवे यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.