Ambadas Danve News : पीकांचे नुकसान पाहण्यासाठी दानवे मोटारसायकलवर शेतात..

Shivsena : शेतकऱ्यांना ३३ टक्के नुकसानीचे निकष न लावता सरसकट मदत द्यावी.
Mla Ambadas Danve On Farm News
Mla Ambadas Danve On Farm NewsSarkarnama

Marathwada : नुकत्याच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पीक आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. (Ambadas Danve) सरकारच्या वतीने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे, तर विरोधकांनी तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.

Mla Ambadas Danve On Farm News
Imtiaz Jalil News : पंच्याऐंशी टक्के खासदार हे जात आणि पैशाच्या जोरावर निवडून येतात..

शनिवार, रविवार दोन दिवस अधिवेशनाला सुटी असल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. (Farmers) मुख्य रस्त्यापर्यंत गाडीने गेल्यानंतर शेतात जाण्यासाठी त्यांनी मोटारसायकलचा वापर केला. (Jalna) बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांना मागे बसवून दानवे यांनी स्वतः मोटारसायकल चालवत शेत गाठले.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले असतानाही अद्याप नुकसानीचे पंचनामेच झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी दानवे यांना सांगितले. जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुका, ढोपटेश्वर शिवार येथील शेतकरी नाथाराम शेळके यांच्या शेतातील डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले. त्याची पाहणी करत दानवे यांनी संबंधितांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी वाहेगाव,शिवार तालुका शेकटा येथील नुकसानग्रस्त शेतकरी साईनाथ तांगडे यांच्या शेतातील बांधावर जाऊन गहू, हरभरा पिकाच्या नुकसानीची पाहणी दानवे यांनी केली. उभी पिकं हाताला आलेली असताना अवकाळी पावसामुळे डाळींब, मोसंबी ही फळं व हरभरा, गहू पिकं नष्ट झाली आहेत. आता दुसरं पिकं घेण्यासारखीही स्थिती नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना ३३ टक्के नुकसानीचे निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशा सूचना दानवे यांनी संबंधित तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या. एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं. सततच्या पावसाची मदत अद्याप मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याची ग्वाही देखील दानवे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com