Ambadas Danve News : बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मान्यता कधी देणार ?

Shivsena (UBT) : सर्वांगीण दृष्टीने या पुतळ्याचे काम परिपूर्ण कसे होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Monsoon News : छत्रपती संभाजीनगर येथे प्रस्तावित हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्वाल्हेर स्टोन मध्ये बांधण्यात येत असलेल्या पुतळ्यास मान्यता कधी मिळणार ? यासाठी नेमलेल्या समितीकडून पुतळ्यास हिरवा कंदील मिळण्यास विलंब का होतोय ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve News) यांनी विधान परिषदेत उपस्थितीत केला.

Ambadas Danve News
Pankaja Munde Birthday News : वाढदिवस साजरा न करता पंकजा मुंडे तिरुपती दर्शनाला..

छत्रपती संभाजीनगर शहरातील महात्मा गांधी मिशन परिसरात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या परिसरात ५ हजार वृक्षारोपण करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असुन यामध्ये काही कमतरता आढळल्यास पर्यावरण प्रेमींकडून हरकत घेतली जाऊ शकते. (Shivsena) त्यामुळे काळजीपूर्वक येथे वृक्षारोपण करण्यात यावे, नाहीतर आगामी काळामध्ये न्यायालयाकडून विविध बंधने लागू केली जाऊ शकतात.

यासोबतच या पुतळ्याच्या भोवती शिवसेनाप्रमुखांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य गॅलरी बांधण्यात येणार आहे. (Aurangabad) यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची अनेक चित्रफीत, भाषणांचा संग्रह व प्रदर्शन प्रस्तावित करण्यात आले आहे. याचे नियोजन करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे का ? याचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

दरम्यान, संभाजीनगर येथे बांधण्यात येत असलेले शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अनेकांसाठी स्फूर्तीस्थळ ठरणार आहे. त्यामुळे सर्वांगीण दृष्टीने या पुतळ्याचे काम परिपूर्ण कसे होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे. नाहीतर विविध त्रुटी दाखवून यामध्ये अनेक संघटना अडथळा आणू शकतात. तसेच येथे प्रस्तावित ई- रिक्षा, तिकीट घर, लॉक रूम व चार्जिंग स्टेशन यांना आणि पुतळ्याला लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी देखील दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com