Ambadas Danve On Bjp : भ्रष्टाचार करा, पण भाजपात या हेच महाराष्ट्रात सुरू..

Marathwada : पक्षांची फोडाफोडी, सत्तेसाठी केंद्रीय यंत्रणाचा वारेमाप गैरवापर यामुळे देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन.
Opposition Leader Ambadas Danve News,
Opposition Leader Ambadas Danve News,Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : भाजपने आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत असा कायम आव आणला. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांची कृती वेगळी आहे, भ्रष्टाचार करा, पण भाजपात या हेच सध्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. (Ambadas Danve On Bjp) लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. त्यांची गरज संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काय हाल होतील, हे बघा असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Opposition Leader Ambadas Danve News,
Sanjay Shirsat News : मी शपथेवर सांगतो, वर्षावर झालेल्या बैठकीत तसे काही घडलेच नाही...

सध्या राजकीय घडामोडीवर दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना भाष्य केले. (SHIVSENA) केंद्रातील सरकार ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स या यंत्रणाचा वापर एखाद्या घरगड्या सारखा करत आहे. गेल्या काही वर्षातील घटना आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांकडे बघितले तर ते स्पष्ट होते. (BJP) भाजपचा भ्रष्टाचाराला विरोध नाही, पण तो नेता इतर पक्षात न जाता आपल्या पक्षात आला पाहिजे, असे घाणेरडे राजकारण दिल्लीत बसलेले नेते करत आहेत.

पक्षांची फोडाफोडी, सत्तेसाठी केंद्रीय यंत्रणाचा वारेमाप गैरवापर यामुळे देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. (Marathwada) शिंदे असो की अजित पवार यांचा उपयोग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करून घेण्यासाठीच त्यांना सत्तेत घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुका झाल्या की शिंदे, अजित पवारांची अवस्था वाईट होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांना कुठलाही अधिकार नाही, सरकारमध्ये काय चाललंय, काय निर्णय घेतले जातात याची माहिती त्यांना नसते, असा दावा देखील दानवे यांनी केला. लोकसभा निवडणुका होईपर्यंतच हे सरकार टिकेल, त्यानंतर सरकारचे काय होते ते पहा असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.

शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या चर्चा सुरू असल्या तरी नेत्यांच्या पातळीवर असा कुठलाही विषय सध्या नाही. या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो दोन्ही पक्षाचे नेतेच घेतील, पण सध्या तरी अशा युतीची कोणतीही शक्यता नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.