Ambadas Danve On Bjp : मैदानाची गोमूत्र शिंपडून शुद्धी म्हणजे भाजपचा शुद्ध ढोंगीपणा..

Shivsena : इम्तियाज जलील राम मंदिरात गेले त्या मंदिराची शुद्धी भाजपने का केली नाही?
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : महाविकास आघाडीची `वज्रमुठ` सभा ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाली, जिथे भारत मातेचे व भारतीय राज्यघटनेचे पूजन केले गेले त्या मैदानाची गोमूत्र शिंपडून शुद्धी म्हणजे हा घटनेचा, भारत मातेचा अपमान आहे. लाखो लोक ही सभा ऐकायला आले होते त्यांचा देखील हा अवमान असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.

Ambadas Danve News
Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..

किराडपुऱ्यातील राम मंदिरात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील गेले होते, मग मंदिराची शुद्धी करून घ्यावी, असे (Bjp) भाजपला का वाटले नाही? असा टोला देखील दानवे यांनी लगावला. राज्यातील पहिली महाविकास आघाडीची संयुक्त सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर काल पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thakckeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्ते आल्यामुळे मैदान पुर्णपणे भरले होते. ठाकरेंनी भाजपवर या सभेतून जोरदार टीका केली.

मोदी-शहा यांच्यासह शिंदे व त्यांच्या मंत्र्यांवर देखील ठाकरेंनी हल्ला चढवला. मात्र दुसऱ्या दिवशी भाजपने या मैदानावर जात गोमुत्र शिंपडून ते शुद्ध केले. सभेमुळे मैदान अपिवत्र झाले होते, म्हणून आम्ही ते शुद्ध करून घेतले, असा दावा भाजपने केला होता. यावर ठाकरे गटाने भाजपचा धिक्कार करत त्यांची ही कृती म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, ज्या नेत्यांचे हात अदानींच्या पैशांनी बरबटलेले आहे, त्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांची गौरव यात्रा काढली तेव्हा तुम्हाला शुद्धी करावीशी वाटली नाही का? इम्तियाज जलील राम मंदिरात गेले त्या मंदिराची शुद्धी भाजपने का केली नाही? असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थितीत केला.

दरम्यान, ज्या मैदानावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विराट सभा घेतल्या व प्रत्येक सभेतून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला गाडण्याचे आवाहन केले, हिंदुत्वाचा हुंकार दिला. माझ्या शिवसेनेची काॅंग्रेस व्हायला लागली असे वाटले तर मी माझी दुकान बंद करेल, असा स्वाभिमानी बाणा ठाकरे यांनी दाखवला होता, ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान कालच्या सभेने अपवित्र झाले, असे म्हणत भाजपने तिथे गोमूत्र शिंपडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com