Ambadas Danve On Kerala Story : केरळ स्टोरी सारखे चित्रपट निवडणुकीच्या वेळीच कसे येतात ?

Marathwada : क्राईम सर्वेक्षणातून राज्यातील पाच हजार तर गुजरातमधून ३० हजार मुली गायब झाल्याचे समोर आले आहे.
Ambadas Danve On Kerala Story News
Ambadas Danve On Kerala Story NewsSarkarnama

Shivsena : एकीकडे केरळ फाईल्स चित्रपट दाखवला जातोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच तर गुजरातमधून गायब झालेल्या ३० हजार मुलींचा शोध का लागत नाही? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थितीत केला. केरळ फाईल्स सारखे चित्रपट निवडणुकीच्या वेळीच कसे येतात? अशी शंका उपस्थितीत करत अशा चित्रपटांच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो, असा आरोप देखील दानवे यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Ambadas Danve On Kerala Story News
Abdul Sattar On Court Decision : उद्याचा निकाल विरोधात गेला तरी स्वागत करू, सत्तार हे काय बोलून गेले..

दानवे म्हणाले, क्राईम सर्वेक्षणातून राज्यातील पाच हजार तर गुजरातमधून ३० हजार मुली गायब झाल्याचे समोर आले आहे, मात्र या मुलींचा शोध का लागत नाही? केंद्र व राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. (Shivsena) महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने शक्ती कायदा तयार करून तो मंजुरीसाठी केंद्र सरकार पाठवला, पण दीड वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडून शक्ती कायद्याला मंजुरी देण्यात आलेली नाही.

सरकार महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. एकीकडे केरला फाईल्स सिनेमा मोफत दाखवला जातो, तर दुसरीकडे (Maharashtra) महाराष्ट्र आणि गुजरातमधून गायब झालेल्या हजारो मुलीचा शोध सरकारला लावता आलेला नाही. (Marathwada) केवळ केरळ फाईल्स सारख्या चित्रपटातून राजकीय फायदा घेणे एवढेच काम भाजप करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला.

शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची अद्यापही चौकशी झालेली नाही, दंगलीतील मुख्य आरोपींवर कारवाई झालेली नाही, शहरात भररस्त्यावर मुलीचा हिजाब उतरवला जातो, त्या मुलीला मारहाण केली जाते तरी देखील सरकारकडून दखल घेण्यात आली नाही, असेही दानवे म्हणाले.

विधीमंडळाच्या अधिवेशनात गारपीट व अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून विदर्भासाठी २२०० कोटी व मराठवाड्याकरिता १५०० कोटी असे ३७०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले नाही. मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार लबाडासारखे वागत असल्याटी टीकाही दानवे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com