Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama

Abdul Sattar On Court Decision : उद्याचा निकाल विरोधात गेला तरी स्वागत करू, सत्तार हे काय बोलून गेले..

Shivsena : परंतु सत्तासंघर्षाचा निकाल आमच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेच्या बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे.
Published on

Maharashtra : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्या येणार आहे. तो कायद्याने आमच्या बाजूनेच लागला पाहिजे, पण शेवटी सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आहे. उद्याचा निकाल आमच्या विरोधात गेला तरी आम्ही त्याचे स्वागत करू, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. छत्रपती संभाजीगर येथील चिकलठाणा विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

Minister Abdul Sattar News
Sanjay Shirsat On Court Decision : कायद्याची चौकट मोडली नाही, म्हणून चिन्ह, नाव मिळालं; निकालही आमच्या बाजूनेच..

आमचे सरकार टिकावे, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कायम राहावे यासाठी अनेक लोक पूजा-पाठ करत आहेत, असेही (Abdul Sattar) सत्तार म्हणाले. राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उद्या या निकालाचे वाचन होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात उद्या काय उलथा-पालथ होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील यावर भाष्य केले. (Shivsena) सत्तार म्हणाले, तुमच्या प्रमाणेच आम्हाला देखील उद्याच्या निकालाची उत्सूकता लागली आहे. हा निकाल आमच्या बाजूने लागावा, कायद्यानूसार तो लागेलही. पण जर निकाल आमच्या विरोधात गेला, तरी देखील आम्ही त्याचे स्वागतच करू. कारण शेवटी सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला निकाल हा मान्य करावाच लागतो.

परंतु सत्तासंघर्षाचा निकाल आमच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेच्या बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे. काही लोक निकाल आमच्या विरोधात जावा, त्यांच्या बाजूने लागावा, यासाठी गणपती बाप्पाला पाण्यात ठेवून बसले आहेत. चंद्रकांत खैरे देखील पुजा-पाठ करत आहेत. पण आमचे मुख्यमंत्री त्यांच्या पेक्षा जास्त हिंदुत्ववादी आहेत. आमचे सरकार टिकावे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहावेत, यासाठी देखील पूजापाठ सुरू असल्याचा टोला सत्तार यांनी खैरेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com