Ambadas Danve On Onion Issue: निर्यात शुल्कवाढीचा निर्णय कांदा उत्पादकांना देशोधडीला लावणारा..

Maharashtra Onion Farmer News: कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याच विधिमंडळात सरकारने कबूल केले होत. २२ ऑगस्ट उजाडली तरी ते मिळाले नाही.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : कांदा खरेदी आणि निर्यात शुल्कवाढीच्या प्रश्नावरून राज्यभरात उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. एक्स्पोर्टसाठी जाणाऱ्या कांद्याचे कंटेनर रस्त्यावर उभे आहेत. अशावेळी केंद्राने नाफेडमार्फत २ लाख मेट्रीक टन कांदा २४१० रुपये प्रति क्विटंल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु कांद्यावरील निर्यात शुल्कवाढी संदर्भात केंद्राने कुठलीही भूमिका घेतलेली नाही.

Ambadas Danve News
Eknath Shinde On Onion Issue: कांदा प्रश्नावर शरद पवारांनी राजकारण करू नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे..

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलतांना केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. (Shivsena) कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय एकप्रकारे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत कांदा निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

राज्य सरकारने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याच विधिमंडळात कबूल केले होत. (Maharashtra) मात्र आज २२ ऑगस्ट आली तरी कांदा उत्पादक (Farmers) शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं आश्वासन सरकारने पाळलेले नाही.आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांचे फायद्याचे नाही तर व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहे.

सरकारने कांदाप्रश्नी तोंड देखलपणा करण्याची गरज नाही, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थितीत केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन नक्की पेटणार, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात तलाठी भरती परीक्षेच्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केले. अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी परीक्षा नीट होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या एजन्सींना काळ्या यादीत टाका आणि त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणीही दानवेंनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com