Ambadas Danve News : पालघरला विमानतळाच्या बाता करणाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या फाईलवरची धूळ हटवावी!

Shiv Sena leader Ambadas Danve's attack on BJP : आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या फाईलवर पंतप्रधान कार्यालयात एवढी धूळ साचली असावी की त्यावरील अक्षरे आता दिसेनाशी झाली असतील.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. महाराष्ट्राच्या या आखाड्यात राज्यातील नेत्यासंह देशपातळीवरील नेत्यांनी प्रचाराच्या आखाड्यात उड्या घेतल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूंनी नेत्यांच्या सभांचे आयोजन धुमधडाक्यात सुरू आहे. यातील दावे-प्रतिदावे-आरोप-प्रत्यारोपावरून दोन्ही बाजूने कलगितुरा रंगू लागला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुतीच्या धुळ्यातील एका सभेत पालघर येथे विमानतळ बनवण्याचे दिलेल्या आश्वासनाचा दाखला देत भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. पालघरला विमानतळ बनवण्याच्या बाता आज दिल्लीच्या पातशहांनी धुळ्यात मारल्या.

Ambadas Danve News
Ambadas Danve News : लक्षात ठेवा, भाजप एकनाथ शिंदेंना रडवणार! अंबादास दानवे पुन्हा बोलले

आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या फाईलवर पंतप्रधान कार्यालयात एवढी धूळ साचली असावी की त्यावरील अक्षरे आता दिसेनाशी झाली असतील. (Shivsena) काय राव, निर्णय घेण्याची गती तुमची गायब झाली, अन चाकं आमच्या गाडीला नाही म्हणता! मोदींचा महाराष्ट्र आणि मराठी द्वेष यापेक्षा वेगळा काय सांगावा? असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Ambadas Danve News
Shivsena Party & Symbol Case : शिवसेना कोणाची? निकाल कधी? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच

नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरूनही अंबादास दानवे यांनी महायुतीला सुनावले. दुटप्पीपणा हा शब्द सुद्धा लाजवलात आपण देवेंद्र फडणवीस. तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटून अजित पवारांनी नवाब मलिक यांना तिकीट दिले. आता तुमच्याच खांद्यावर बसून त्यांच्या प्रचाराला अजित पवार गेले. आता पुरावे काय गाठोड्यात बांधून गंगेत सोडून आले का? देवेंद्र फडणवीससाहेब, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली.

Ambadas Danve News
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

एकूणच विधानसभा निवडणुकीचा प्रचार पुढे सरकत आहे, तशी विरोधकांकडून महायुतीवर केली जाणारी टीका धारदार होत चालली आहे. महायुतीचे नेतेही महाविकास आघाडीच्या आरोपांना जशासतसे उत्तर देतांना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com