Ambadas Danve News : पदासाठी पक्ष बदलणार नाही, काही मिळालं नाही तर संघटनेचं काम करणार !

Shiv Sena leader Ambadas Danve made it clear he will not switch parties for any position. : उद्धव ठाकरे यांनी अंबादास आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, पण निष्ठा कायम राखत स्वतःची उंची वाढवा, असे आवाहन केले.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीत मला शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारीसाठी आॅफर होती. पण मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचार कधी सोडणार नाही? पदासाठी तर नाहीच नाही. आताही मला पद मिळाले नाही, तर संघटनेसाठी काम करेल. पद काय येतात-जातात संघटना महत्त्वाची आहे, ती टिकली पाहिजे, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'एबी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केली.

सत्ता, पदापेक्षा संघटना आणि तिचे काम महत्त्वाचे आहे. पदासाठी पक्ष बदलणार नाही, अगदी आताही काही मिळलं नाही तर संघटनेचा काम करायला मी तयार आहे, असेही दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितले. विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंबादास दानवे यांचा कार्यकाळ येत्या 29 आॅगस्ट रोजी संपणार आहे. त्यांचे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन असल्याने त्यांना सभागृहाच्या वतीने निरोप देण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्याच नेत्यांनी अंबादास दानवे यांना निरोप देताना त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. (Shivsena) मुख्यमंत्र्यांनी अंबादास दानवे हे मुळचे भाजपचे होते, भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यात चिकाटी, अभ्यासूवृत्ती आणि संघटन कौशल्य हे गुण असल्याचे सांगत त्यांना खुनावले होते. तर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून देत आपल्याकडे येण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आॅफर दिली.

Ambadas Danve News
Ambadas Danve-CM Fadnavis News : मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले अन् अंबादास दानवेंनी त्यांच्याच कारभाराचे वाभाडे काढले!

उद्धव ठाकरे यांनी अंबादास आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, पण निष्ठा कायम राखत स्वतःची उंची वाढवा, असे आवाहन केले. एकूणच अंबादास दानवे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबणार नाहीत, ते भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जातील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतः अंबादास दानवे यांनी मी पुन्हा येईन, पण कोणत्या मार्गाने हे विचारू नका, असे म्हणत सस्पेंस निर्माण केला होता.

Ambadas Danve News
Devendra Fadnavis On Ambadas Danve : अंबादास दानवे भाजपच्या मुशीत तयार झालेले; म्हणून त्यांच्यात संघटनात्मक कौशल्य अन् अभ्यासू वृत्ती!

या पार्श्वभूमीवर आज दिलेल्या मुलाखतीत अंबादास दानवे यांनी आपण पदासाठी पक्ष बदलणार नाही, असे स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संधी दिल्यामुळे दानवे यांना आमदार आणि नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होता आले होते. सभागृहात पक्षाची आणि राज्याच्या जनतेची बाजू नेटाने, आक्रमकपणे मांडत अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला. परंतु आमदारकीची मुदत संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

Ambadas Danve News
Uddhav Thackeray Interview : ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न, पण हे काळाच्या ओघात येतात अन् जातात.."; 'सामना'च्या मुलाखतीतून ठाकरेंचा हल्लाबोल

शिवाय सत्ताधारी भाजप, शिवसेना त्यांच्यासाठी जाळे टाकून आहेत. अशावेळी पदासाठी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. आताही पद मिळाले नाही, तर पक्ष संघटनेचे काम करेल, असे सांगत अंबादास दानवे यांनी आपल्याबद्दल सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला तूर्तास पूर्णविराम दिला आहे. मग त्यांच्या 'पुन्हा येईन' घोषणेचे काय होणार? हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com