Shivsena Leader Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री द्या हो.. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे..

Ambadas Danve Letter To CM Shinde : संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अब्दुल सत्तार, भाजपचे अतुल सावे यांचा डोळा आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शंभुराज देसाई यांच्याकडे संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणार अशी चर्चा होती.
MLA Ambadas Danve-Cm Eknath Shinde-MP Sandipan Bhumre
MLA Ambadas Danve-Cm Eknath Shinde-MP Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून गेले आहेत. त्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वासह मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. भुमरे संभाजीनगरचे पालकमंत्री होते, पण ते खासदार झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्र्यांची तातडीने नियुक्ती करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पालकमंत्री देण्याची मागणी केली आहे. संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अब्दुल सत्तार, भाजपचे अतुल सावे यांचा डोळा आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शंभुराज देसाई यांच्याकडे संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणार अशी चर्चा काही दिवसांपुर्वी सुरू होती.

तर दुसरीकडे संदीपान भुमरे खासदार म्हणून निवडून गेले असले तरी विधीमंडळाच्या नियमानूसार ते मंत्रीपदावर कायम राहू शकतात, त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत भुमरे यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याची चर्चा देखील मध्यंतरी होती. (Shivsena) संजय शिरसाट यांची पालकमंत्री होण्याची इच्छा होती, परंतु मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यात संधी मिळाल्याशिवाय ते शक्य नाही.

MLA Ambadas Danve-Cm Eknath Shinde-MP Sandipan Bhumre
Ambadas Danve : कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यांना भाजपनेच पद्मविभूषण दिल्याचा लाड यांना विसर पडला का?

अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मेहनतीमुळे संदीपान भुमरे यांचा विजय झाला, त्याचे बक्षिस म्हणून पालकमंत्री पद भाजपकडे म्हणजेच अतुल सावे यांच्याकडे द्यावे, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली होती. जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला होता.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन विकासाचे नियोजन, निधीचे वाटप केले जावे, याची जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आमदारांना घाई झाली आहे. पालकमंत्री नियुक्त न केल्यास जिल्हा नियोजन समितीचा निधी अखर्चित राहण्याची भिती अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. माजी आमदार संदिपान भुमरे यांची लोकसभा सदस्य म्हणून निवड झाली असल्याने विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.

MLA Ambadas Danve-Cm Eknath Shinde-MP Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar Guardian Minister : सत्तार, सावे, शिरसाट सगळ्यानाच व्हायचयं पालकमंत्री, पण मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळंच?

त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागील बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा. जिल्ह्याचे पालकमंत्री पद (Guardian Minister) रिक्त झालेले असल्याने जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक आजतागायत होवु शकलेली नाही. तसेच पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्ह्याचे नियोजन पूर्णतः ठप्प झाले आहे.

संभाजीनगर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी पालकमंत्री नसल्याने अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. तसेच आगामी काळात राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याने तात्काळ नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे अंबादास दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com