
Shivsen UBT Ambadas Danve News : संविधान अपमानाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या तोडफोडी प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कायदा - सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणिा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतीच्या केलेल्या ठिकाणी भेट दिली आणि अभिवादन केले.
तसेच ११ डिसेंबर रोजी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेत शांततेत पुकारण्यात आलेल्या बंदच्या प्रसंगी काही उपद्रवींनी तोडफोड करत हिंसाचार घडवला. त्या ठिकाणांची सुद्धा दानवे यांनी पाहणी करत व्यापारी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या सदस्यांशी चर्चा करत पुकारलेल्या बंदला मागे घेण्याचा आग्रह अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी केला.
त्यावर तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे व शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळण्याची प्रशासनाकडून हमी मिळल्यानंतर दानवे यांच्या आग्रहाला मान देत व्यापारी महासंघाने पुकारलेला बंद मागे घेतला. देशातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान असलेल्या संविधानाचा अपमान होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकशाही व्यवस्थेत सविधान हा खूप महत्वपूर्ण ग्रंथ असून त्याचा आदर राखला गेलाच पाहिजे, अशी भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली.
याशिवाय, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून संबंधित प्रकरणी कारवाई न करण्यासाठी दबाव आल्याची शंका आहे. संविधान अपमानाची घटना घडली त्या दिवशीच जिल्ह्यात जमाव बंदी करायला हवी होती. पोलीस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी यांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात ठेवायला पाहिजे होता, असे मुद्दे दानवे यांनी उपस्थित केले.
नागरिकांना शांततेचे आवाहन करत आगामी नागपूर येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सदरील प्रकरणावर आवाज उठवणार असल्याची ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणि प्रशासनाने शासन स्तरावर प्रस्ताव पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी संबंधित विषयी व्यापाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी केली चर्चा. याप्रसंगी आमदार डॉ.राहुल पाटील(Rahul Patil), माजी आमदार विजय गव्हाणे,जिल्हाप्रमुख विशाल कदम, अनिल डहाळे,सूर्यकांत हाके,नितीन उट्टमवार व अशोक माटरा उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.