Amit Deshmukh : भावाच्या पराभवाची सल कायम; अमित देशमुख म्हणतात, 'मांजरा पट्ट्यात हे झालचं कसं?'

Political News : लातूर ग्रामीणवर काँग्रेसचा झेंडा फडकलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. लातूर शहरमधून स्वत: अमित देशमुख यांना विजयासाठी भाजपच्या अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याशी झुंजावे लागले होते.
amit deshmukh, dheeraj deshmukh
amit deshmukh, dheeraj deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : मांजरा सहकारी साखर कारखान्याचे मजबूत जाळे, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची पुण्याई आणि लातूर जिल्ह्यावर काँग्रेसची मजबूत पकड असताना लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख पराभूत झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के निवडून येण्याची खात्री असलेल्या या मतदारसंघात धाकट्या भावाचा भाजपच्या उमेदवाराकडून झालेला पराभव आणि त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.

लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी मांजरा साखर उद्योगाच्या सभेत आपल्या भाषणातून ही सल बोलून दाखवली. मांजरा पट्ट्यात हे झालचं कसं? असा सवाल करतानाच येणाऱ्या निवडणुकीत लातूर ग्रामीणवर काँग्रेसचा झेंडा फडकलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. लातूर शहरमधून स्वत: अमित देशमुख यांना विजयासाठी भाजपच्या अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याशी झुंजावे लागले होते.

तर दुसरीकडे लातूर ग्रामीणची जागा सहज निवडून येईल, असा काँग्रेसचा भ्रम खोटा ठरला. भाजपच्या रमेशअप्पा कराड यांनी काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा पराभव केला. जिल्हा काँग्रेस आणि वैयक्तिक देशमुख परिवारासाठी हा मोठा धक्का होता. म्हणूनच दोन वर्षानंतरही या पराभवाच्या जखमा ताज्या वाटतात.

amit deshmukh, dheeraj deshmukh
MLC Election : "मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला... फसवणूक केली" : मुलाला डावलताच उत्तमराव जानकरांचे गंभीर आरोप

अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात आतापर्यंत सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पराभूत झाल्याबद्दल खंतही व्यक्त केली. लातूर शहरमध्ये मी जेवढ्या मतांनी निवडून आलो, तेवढ्या मतांनीही धीरज देशमुखांची जागा निवडून आली नाही. मांजरा पट्ट्यात हे घडलंच कसं? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

amit deshmukh, dheeraj deshmukh
Massajog Sarpanch Election: मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट; प्रतिस्पर्धी उमेदवाराचा गंभीर आरोप; धनंजय देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

यापुढे होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकींमध्ये लातूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचाच खासदार आणि आमदार निवडून गेला पाहिजे, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले. डिलिमिटेशन होईल, मतदारसंघांची रचना बदलेल, महिलांना आरक्षण मिळेल, पुढे काय होईल? ते सांगता येत नाही. पण लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे, याचा पुनरुच्चार अमित देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com