Mahayuti News : अमित शहांचा सल्ला मित्रपक्षांनीही मनावर घेतला; स्थानिकमध्ये युतीच्या 'कुबड्या' झुगारल्या

Local Body Election No Alliance : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याआधीच भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार, असे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर करून टाकले होते.
Parbhnai Local Body Elcction-Meghna Bordikar-Rajesh Vitekar-Ratnakar Gutte News
Parbhnai Local Body Elcction-Meghna Bordikar-Rajesh Vitekar-Ratnakar Gutte NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अमित शहांच्या "स्वबळावर लढा" या सल्ल्यानंतर भाजपच्या मित्रपक्षांनी स्थानिक निवडणुकांत युतीच्या कुबड्या झुगारण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. अनेक जिल्ह्यांमध्ये मित्रपक्षांनी स्वबळावर उमेदवारी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे.

  3. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात नवी समीकरणं आणि थेट स्पर्धा निर्माण होणार आहेत.

गणेश पांडे

Local Body Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची तीनही पक्षाच्या नेत्यांची भाषा बदलू लागली आहे. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार तिथल्या नेत्यांना दिले जातील, असेही सांगितले गेले. आता तेच स्थानिक नेते वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल असे बोलू लागले आहे. महायुतीमधील हा घोळ काही केल्या मिटताना दिसत नाहीये. इकडे परभणी जिल्ह्यात मात्र महायुतीच्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी 'एकला चलो चा' नारा दिला आहे.

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याआधीच भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार, असे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर करून टाकले होते. अशीच भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे यांनीही घेतली आहे. गुट्टे यांनी स्थानिक आघाडी तयार करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर राजेश विटेकर यांनी कार्यकर्त्यांना संधी आणि पक्षाची ताकद पाहता युतीच्या कुबड्या नको, अशी भूमिका घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत एकत्र लढून यश संपादन केलेले महायुतीचे नेते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना मात्र 'एकला चलो'चा नारा देताना दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांचे समर्थक या तिन्ही गटांकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीतील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वर्चस्व आणि अस्तित्वाची लढाई चुरशीची ठरणार आहे.

Parbhnai Local Body Elcction-Meghna Bordikar-Rajesh Vitekar-Ratnakar Gutte News
Parbhani News : पालकमंत्री मेघना बोर्डीकर याच्यांसह सत्ताधारी-विरोधकांचा 'स्थानिक'मध्ये लागणार कस!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसह त्यांचे मित्र पक्ष स्वबळावर लढवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून गंगाखेड मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, असे जाहीर केले होते. यावरून गुट्टे यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केल्याचे समोर आले आहे.

Parbhnai Local Body Elcction-Meghna Bordikar-Rajesh Vitekar-Ratnakar Gutte News
Mahayuti News : महायुतीला 'धक्का'! शहांच्या मेसेजनंतर भाजपकडून स्वबळाची मोर्चेबांधणी, शिंदे-अजितदादांना धडकी

दुसरीकडे आमदार राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर जाळे उभे केले आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची पारंपरिक पकड लक्षात घेता, ते महायुतीच्या बंधनात राहतील, अशी शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. राज्य पातळीवर महायुतीचे नेते एकतेचे संदेश देत असले तरी जिल्हा पातळीवर वेगळीच चित्र आहे. प्रत्येक पक्ष मीच मजबूत या भूमिकेतून रणनिती आखू लागला आहे. भाजपची संघटनशक्ती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि रत्नाकर गुट्टे यांचे आर्थिक व राजकीय बळ, या तिन्ही घटकांच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीतील गट स्वतःचे ताट सजवण्याच्या तयारीत आहेत.

महायुतीतील नेते-पदाधिकाऱ्यांतील कुरघोड्यांमुळे जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 'एकता की कुरघोडी' या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातूनच मिळणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत महायुतीतला सलोखा केवळ कागदोपत्री राहिला असून, जमिनीवर मात्र प्रत्येक गट स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

FAQs

1. अमित शहांनी नेमका काय सल्ला दिला होता?
अमित शहांनी भाजपच्या नेत्यांना स्थानिक निवडणुकांमध्ये युतीवर अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला होता.

2. कोणत्या मित्रपक्षांनी यावर प्रतिसाद दिला आहे?
मित्रपक्षांनीही युतीच्या कुबाड्या झुगारत स्वबळाची तयारी सूरू केली.

3. या निर्णयाचा भाजपवर काय परिणाम होईल?
भाजपला काही ठिकाणी स्पर्धा वाढेल, परंतु पक्षाला संघटनात्मक ताकद सिद्ध करण्याची संधीही मिळेल.

4. युतीत फूट पडण्याची शक्यता आहे का?
काही ठिकाणी असंतोष वाढू शकतो, पण राज्यस्तरावर औपचारिक फूट सध्या अपेक्षित नाही.

5. स्थानिक निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
यामुळे थेट लढती वाढतील, आणि स्थानिक पातळीवर नवीन राजकीय नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com