MP Nagesh Pati Ashtikar News : 'कितने साल के हो गये हो भैय्या', अमित शहांचा खासदार नागेश आष्टीकरांना फोन!

Amit Shah Calls Shiv Sena MP Nagesh Patil on Birthday : नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण व इतर पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी तिथे उपस्थित होते. या सगळ्यासमोरच नागेश पाटील आष्टीकर यांना शहा यांनी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Amit Shah Wish MP Nagesh Patil Ashtikar News
Amit Shah Wish MP Nagesh Patil Ashtikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आरूढ झाल्यानंतर 'आॅपरेश लोटस'ची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उर्वरित खासदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू होते. याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांवरही भाजपाचा डोळा होता. पण कालांतराने हे आॅपेरशन बारगळले. याची नव्याने आठवण होण्याचे कारण म्हणजे देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे चाणाक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शहा यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना आलेला फोन.

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मराठवाड्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आष्टीकर यांचे अभीष्टचिंतन केले. यात एक विशेष फोन आला तो म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा. काही सेंकदाच्या या फोन काॅल आणि त्यातील संवादाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. 'नागेश पाटील आष्टीकरजी आपको बहोत बहोत बधाई और शुभकामनाये' असे म्हणज शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर 'बहोत बहोत धन्यवाद सर, आपणे फोन किया' असे म्हणत आष्टीकरांनी त्यांचे आभार मानले.

यावर 'कितने साल के हो गये हो भैय्या' असा प्रश्न शहा यांनी केला, त्याला स्मित हास्य करत आष्टीकर यांनी 'अब फिप्टी फोर का हो गया हू सर' असे उत्तर दिले. त्यावर फिरसे बधाई म्हणत शहा यांनी फोन ठेवला. यावेळी नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार रविंद्र चव्हाण व इतर पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी तिथे उपस्थित होते. या सगळ्यासमोरच नागेश पाटील आष्टीकर (Hingoli) यांना अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा जेव्हा काही महिन्यापुर्वी राज्यात सुरू होत्या. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव होते.

Amit Shah Wish MP Nagesh Patil Ashtikar News
Video Nagesh Patil : शपथविधीवेळी वडील अन् बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण; अध्यक्षांनी नागेश पाटील-आष्टीकरांची शपथ थांबवली अन्...

अर्थात तेव्हा आष्टीकर यांनी या सगळ्या अफवा असून आपण कुठेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आज अमित शहा यांचा खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आष्टीकर यांना आलेला फोन याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. या निमित्ताने पुन्हा एका आॅपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. मी एक छोटा माणूस आहे, पण वेळात वेळ काढून तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या, असे आवाहनही आष्टीकर यांनी केले.

Amit Shah Wish MP Nagesh Patil Ashtikar News
Amit Shah Retirement : मोठी बातमी : अमित शहांनी जाहीर केला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाले, निवृत्तीनंतर...

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोली मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा 108602 मतांनी पराभव केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कदम यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली होती. हिंगोलीत येऊन जाहीर सभाही घेतल्या होत्या. परंतु नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या पराभव करत दिमाखात लोकसभेत एन्ट्री केली. अमित शहा यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलेला फोन हा आष्टीकर यांच्यासाठी खास असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com