हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या शपथविधीवर लोकसभेत आक्षेप घेण्यात आला. शपथविधीवेळी आष्टीकर यांनी वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं.
त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत दुरूस्ती सुचवली. अध्यक्षांनी दुरूस्ती सुचविल्यानंतर आष्टीकरांना ( Nagesh Patil Ashitkari ) पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.
नेमकं झालं काय?
शपथविधीच्या सुरूवातीला नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, "मी नागेश बापूराव-पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्यानं, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रति अनन्य श्रद्धा आणि निष्ठा बाळगेल."
यानंतर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी आष्टीकर यांचा शपथविधी थांबवला. "जे लिहिलंय तेच वाचा. असं चालणार नाही. जे मराठीत लिहिलं आहे, तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल," असं भर्तृहरी महताब यांनी सांगितलं. त्यानंतर आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. तेव्हा, अन्य नावांचा उल्लेख टाळत, जसं लिहिलं तशीच शपथ आष्टीकरांनी घेतली आहे.
बाबुराव कदम यांचा केला पराभव
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबुराव कदम यांचा 1 लाख 8 हजार 602 मतांनी पराभव केला होता. नागेश पाटील-आष्टीकर यांना 4 लाख 92 हजार 535 मते मिळाली होती. तर, बाबुराव कदम यांना 3 लाख 83 हजार 933 मते पडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.