Maratha Reservation Protest : ...अन् 'त्या' अग्नितांडवातून क्षीरसागर कुटुंबीय वाचले !

NCP MLA Sandip Kshirsagar News : ...या आगीत क्षीरसागरांच्या दारातील दोन कुत्र्यांचा होरपळून मृत्यू!
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी दुसऱ्यांदा दंड थोपटले आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे; पण याचवेळी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाचा भडका उडाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांच्या घराला आग लावली आहे.

तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचं कार्यालय आंदोलकांनी पेटवलं आहे, पण या आगीत क्षीरसागर कुटुंबीय कौशल्य अन॒ कसरतीने बाहेर आले. मात्र, या आगीत क्षीरसागरांच्या दारातील दोन कुत्र्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

Maratha Reservation Protest
Maratha Agitation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; जाणून घ्या, दिवसभरात काय जाळले अन् काय फोडले?

बीड शहरात दुपारनंतर आंदोलन चिघळले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. नगर रोडवरील क्षीरसागरांच्या बंगल्यासमोरील भागाला आग लावल्यानंतर आतमध्ये असलेल्यांना मोठी कसरत व कौशल्याने बाहेर काढण्यात आले, तर पोलिसांनी अश्रुधुराच्याा नळकांड्या फोडल्यामुळे जमाव पांगला व पंडितांचा सुभाष रोडवरील बंगला वाचला.

मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation ) अगोदर साखळी उपोषण, नंतर शासकीय कार्यालये बंद केल्यानंतर दगडफेक सुरू केली. यानंतर शहरातील रस्त्यांवर टायर तसेच बॅनर जाळण्यात आले. रात्री नगर रोडवरील माजी मंत्री व आमदार क्षीरसागर यांच्या घराकडे जमाव गेला. हजारो लोकांनी घोषणा देत बंगल्याच्या आवारात आग लावली. वाहनांनी पेट घेतल्याने आगीचे मोठे लोट निघत होते.

या वेळी क्षीरसागरांच्या कुटुंबातील आमदार संदीप क्षीरसागर(Sandip Kshirsagar),त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासह त्यांची चार मुले अशी मंडळी घरात होती.

आगीचे लोट अधिक व दारात हजारोंची गर्दी होती. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण होते. याचवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड फौजफाट्यासह दाखल झाले.

Maratha Reservation Protest
Maratha Reservation News : मंत्री, आमदार, खासदारांच्या घर, कार्यालयावर पोलिसांचा खडा पहारा...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे क्षीरसागर कुटुंबीय सुरक्षित...

आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी त्यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका घरात छतावरून उतरल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यांना यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यांनी समवेत त्यांची दोन मुले व डॉ. योगेश क्षीरसागर यांची मुलेही नेली, तर पोलिसांनी मोठ्या कसरत व कौशल्याने घरातील डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांना पोलिस वाहनातून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

आगीपासून 'असे' वाचले पंडितांचे 'शिवछत्र'...

अगोदर सुभाष रोड व शहरात तोडफोडीनंतर रात्री आंदोलकांननी क्षीरसागरांच्या बंगल्याला आग लावली. यानंतर आंदोलकांनी पुन्हा सुभाष रोडकडे कूच केली. अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यावर दगडफेक सुरू केली. उशिरापर्यंत ही दगडफेक सुरू होती. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा पोचला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांचा जमाव पांगविण्यात यश आले. त्यामुळे पंडितांचे 'शिवछत्र' निवासस्थान आगीपासून वाचले.

(Edited By Deepak Kulkarni)

Maratha Reservation Protest
Assembly election : पाच राज्यांतील निवडणुकीत कोणाला मिळणार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी; अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com