Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मागील दोन दिवस तोडफोडीनंतर आज (ता. ३०) अगोदर शासकीय कार्यालये बंद करत आंदोलकांनी शहराला लक्ष्य केले. शहरातील बाजरापेठा बंद करून जागोजागी टायर जाळले गेले, तर सायंकाळनंतर नेत्यांची घरं व कार्यालये पेटवली गेली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे नगर रोडवरील बंगलाही जाळण्यात आला. तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू सुंदरराव सोळंके यांचा बंगला आंदोलकांनी जाळला. समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेल आंदोलकांनी जाळले.
- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांचा नगर रोडवरील बंगल्यासमोरील गाड्या व समोरच्या भागाला आग लावण्यात आली.
- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सोनाजीराव होमिओपॅथिक महाविद्यालयातील कार्यालय पेटवून देण्यात आले.
- क्षीरसागरांच्या बंगल्यासमोरील वाहनेही जाळण्यात आली.
- समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली.
- बार्शी रोडवरील राष्ट्रवादी (शरद पवार गट) भवन पेटवून देण्यात आले.
- आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके व माजी सभापती जयसिंह सोळंके यांचा उत्तम नगर भागातील बंगल्याला आग लावण्यात आली.
- सुभाष रोडवरील मंगेश लोळगे यांच्या सोन्याचे दुकानावर दगडफेक करण्यात आली.
- शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळुक यांच्या कार्यालयांवर दगडफेक.
- मिलन हॉटेलवरही दगडफेक.
- भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरावर दगडफेक.
- भाजप जिल्हा कार्यालयावर दगडफेक.
- सुभाष रोडवरील माजी मंत्री शिवाजीराव पंडित व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानावर दगडफेक.
- नगरपालिका कार्यालयाच्या बाहेरच्या भागावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या
- शहरातील साठे चौकातील बजाज शोरूम बाहेरून दगडफेक करून फोडण्यात आले.
- याच भागातील रिलायन्स ट्रेंड्स शोरूमच्या काचाही दगड मारून फोडण्यात आल्या.
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.