Santosh Deshmukh Murder Case : ...तरच धनंजय मुंडेंचा अँगल बाहेर येईल; अंजली दमानियांच्या दाव्यानं खळबळ

Anjali Damania Beed Police press conference Santosh Deshmukh murder case Minister Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिस पत्रकार परिषद का घेत नाही, असे म्हणत अंजली दमानिया यांचा मंत्री धनंजय मुंडेंच्या अँगलबाबत मोठा दावा.
Minister Dhananjay Munde
Minister Dhananjay MundeSarkrnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा प्लेनने पळून जात असताना आणि पुण्यातील पोर्श कार अपघातात, पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत पोलिसांनी अद्याप पत्रकार परिषद घेतली नाही? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

'पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यास मंत्री धनंजय मुंडे यांचा अँगल समोर येईल, आणि तोच येऊ द्यायचा नाही', असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना, पूर्वी आणि आता नव्याने केलेल्या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी बीडमधील (BEED) राजकीय गुन्हेगारीवर भाष्य करताना संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे अँगल कधी बाहेर येईल, यावर मोठं भाष्य केलं.

Minister Dhananjay Munde
BEED Politics : मंत्री मुंडे अन् आमदार धसांची छुपी डील काय आहे? अंजली दमानियांनी सर्व काही सांगितलं

अंजली दमानिया म्हणाल्या, "बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत खुलासे होणे बाकी आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सरकारी निवासस्थानात, 19 जूनला कारवाई झाली होती. 3 कोटींच्या खंडणीचा व्यवहार तिथं झाला होता, तर अवादा कंपनीचे सेटमेंट का झाली नाही? या व्यवहारातील इतर लोकांची सेटमेंट का झाली नाही?"

Minister Dhananjay Munde
Anjali Damania : पूर्वी 342 कोटींचा, आता नवीन 200 कोटींचा, मंत्री मुंडेंचा आणखी एक घोटाळा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'आता वाचूच शकत नाही'

'जितेंद्र आव्हाड यांनी जे मुद्दे मांडले, ते मी मांडलेले आहेत. प्लेनमधून उडून जाणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलांसाठी पत्रकार परिषद होऊ शकते, पोर्शच्या कार अपघातात पत्रकार परिषद होऊ शकते, तर या प्रकरणात आजपर्यंत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का मुद्दे मांडले नाहीत? यातून धनंजय मुंडेंचा अँगल बाहेर, आताच्या घटकेला त्यांना यासाठी पदोपदी वाचवले जात आहे', असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

'जोपर्यंत आपल्या हातात, गोष्टी येणार नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी दाखवून, म्हणजेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून मी त्यांचा राजीनामा करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात अशी हत्या घडू नये, यासाठी मंत्र्यांना अद्दल घडविण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. हे कुठेतरी थांबायला हवे', असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com