
Marathwada Political News : विधानसभा निवडणुकीआधी पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी देऊन मैदानात उतरवलेल्या राजू शिंदे यांचा पराभव झाला होता. राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी कमालीचे नाराज झाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या सर्व नाराजांची समजूत काढून सगळ्यांना राजू शिंदे यांच्या कामाला लावले.
परंतु संजय शिरसाट यांच्यापुढे शिंदे टिकू शकले नाहीत. पराभूत झाल्यानंतर काही दिवस शांत बसलेल्या राजू शिंदे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. (Shiv sena) परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी भागवत कराड यांच्या उमेदवारीला विरोध आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अतुल सावे यांच्या विरोधात एमआयएमला मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे अनेकदा पक्ष सोडून बंडखोरी करणाऱ्या राजू शिंदेंना पुन्हा पक्षात घेऊ नका, असा सूर स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी लावला.
पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आग्रा येथे झालेल्या सोहळ्यात राजू शिंदे यांनी हजेरी लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत राजू शिंदे यांनी पुन्हा पक्षात घेण्यासाठी त्यांना साकडे घातल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या घरवापसीला फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे. आज राजू शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून मी व माझे सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांच्या व अंबादासजी दानवे साहेब, शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांच्याबद्दल नाराजी असल्यामुळे मी व माझे सर्व समर्थक सहकारी शिवसेना पक्षाचा, विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो स्वीकारावा.
उद्धवजी ठाकरे, अंबादासजी दानवे साहेब यांचे मनःपूर्वक आभार, असे राजू शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. राजू शिंदे यांनी राजीनामा पत्रातही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने यामागचा बोलवता धनी कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. राजू शिंदे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला असला तरी भाजपाच्या त्यांच्या प्रवेशाबद्दल कुठलेही भाष्य अद्याप केलेले नाही. परंतु लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.