Beed ACB Case : बीड जिल्ह्यात लाचखोरांनी लाज नाकाला गुंडाळली

Anti Corruption Department : परिसरातील धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही जिल्ह्यात येऊन लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या.
ACB Case
ACB CaseSarkarnama
Published on
Updated on

जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध विभागातील लाचखोरी मागच्या पंधरवाड्यात भलतीच चव्हाट्यावर आली आहे. लाचखोरांच्या रोजच नव नव्या घटना समोर येत आहेत. लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या लॉकरमध्ये दोन किलो सोन आणि रोख रकमेची मोजदाज संपताच त्याच रात्री केजमधील तहसिलदार अभिजीत जगताप व कोतवालांवरही लाचेची कारवाई झाली.

मागच्या 15 तारखेपासून लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कारवायांचे सत्र सुरु केले आहे. परिसरातील धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही जिल्ह्यात येऊन लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, शुक्रवारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी शेतकऱ्यांकडून लाच स्विकारताना माजलगाव पाटबंधारे विभागाचा परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या अंबाजोगाईच्या भाड्याच्या घरातही 11 लाख 78 हजार रुपये रोख, तीन तोळे सोने व तीन किलो वजनाचे चांदीचे ताट, ग्लास, तांब्या, समई आदी वस्तू आढळल्या होत्या.

त्यानंतर पथकाने शुक्रवारी त्यांना घेऊन त्यांच्या मिरज (जि. सांगली) या गावी जाऊन सुरुवातीला त्याच्या घराची झडती घेतली. त्यानंतर त्यांच्या युनिअन बँक ऑफ इंडियाच्या मिरज शाखेतील लॉकरची तपासणी केली. यामध्ये रोख 11 लाख 89 हजार रूपये, दोन किलो 105 ग्रॅम सोने ( 1114 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे, 991 ग्रॅमचे इतर दागिने) आढळले. या झडतीमध्ये तब्बल एक कोटी 61 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल लाच लुचतप प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे यांच्या पथकाने जप्त केला.

याच रात्री धाराशिवच्या लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau) विभागाच्या पथकाने स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रूपयांची लाच प्रकरणी केजचे तहसीलदार व कोतवालावर कारवाइृ केली. तहसीलदार अभिजीत जगताप मात्र फरार झाला. कोतवाल मच्छिंद्र माने 20 हजार रुपये घेताना जाळ्यात अडकला. कोतवाल माने हा तहसीलदार जगताप यांच्यासाठी वसूलीचे काम करतो. तालुक्यातीलच एका रेशन दुकानातील धान्य साठा आणि वाटपात तफावत आढळली होती. त्यामुळे त्या दुकानावर कारवाई न करण्यासाठी चाळीस हजार रूपयांची लाच तहसील अभिजीत जगताप यांनी मागितली होती.

ACB Case
Vidhan Parishad Election News : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक टांगणीला; 'हे' आहे कारण

त्यातील वीस हजार रूपये कोतवाल माने यांच्या मार्फत घेण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराला अंबाजोगाई रस्त्यावरील एका ढाब्यावर बोलावून घेतले. लाच स्वीकारताच कोतवाल मच्छिंद्र माने याला 'एसीबी'ने ताब्यात घेतले. तोपर्यंत इकडे तहसीलदार अभिजित जगताप हे तहसील कार्यालयातून फरार झाले.

दरम्यान, मागच्या पंधरवाड्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिस अधिकारी, तीन अभियंते, एक नगर रचनाकार, एक पोलिस हवालदारावर कारवाई केली. यातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेचा निलंबीत पोलिस (Police) निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या बीडच्या भाड्याच्या घरात देखील रोख एक कोटी आठ लाख रुपये, 97 तोळे सोने, साडेपाच किलो चांदी आढळली होती. तसेच, त्याचा फरार साथीदार व निलंबीत फौजदार रवीभूषण जाधवर याच्या घरातही 25 तोळे सोने आढळले.

ACB Case
Lok Sabha Election 2024 Phase 7 : देशभरातील 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com